शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोचे अखेर होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:34 IST

महापौरांचे आदेश : वरखेडीकरांना दिलासा

धुळे : शहरातील वरखेडी येथील कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित केला जाणार असून तसे आदेश मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दिले. त्यामुळे या डेपोमुळे नागरिकांची मोठ्या त्रासातून सुटका होणार आहे.‘लोकमत’ने मंगळवारीच प्रसिध्द झालेल्या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन महापौर सोनार यांनी वरखेडी रस्त्यावरील कचरा डेपो बिलाडी रोडवरील सरकारी जागेवर स्थलांतर करण्याचा हा आदेश दिला.महानगर पालिकेत सकाळी प्रथम महापौर सोनार यांच्या दालनात सकाळी ११ वाजता तातडीची बैठक बोलविण्यात आली.या बैठकीला स्वत: महापौर सोनार, उपायुक्त शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता कैलास शिंदे, नगरसचिव मनोज वाघ, वरखेडी येथील नगरसेवक शत्रुघ्न भिल, संजय भिल, विजय जाधव, स्वच्छता विभागाचे लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते़२०१७ पासून होती मागणीवरखेडी कचरा डेपोतील प्रचंड कचरा व दुर्गधीला वरखेडीसह जुन्या धुळ्यातील नागरिकांना सतत सामोरे जावे लागत होते. यापूर्वी नगरसेवक असतांना २०१७ साली महापालिका प्रशासनाकडे हा कचरा डेपो स्थलांतर करण्याची मागणी मीच केली होती, असे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र मनपाकडे पर्यायी जागा नसल्याने मार्ग निघाला नाही. नंतर मात्र हद्दवाढीतील ११ गावांच्या समावेशामुळे बिलाडी गावातील ३० एकर सरकारी जागेवर वरखेडी कचरा डेपो स्थलांतर करण्याची मागणी केली होती़ या डेपोच्या स्थलांतरामुळे नागरिकांचे सर्व प्रश्न सुटतील, असे बैठकीत सांगून महापौरांनी याबाबत आदेश दिले.बिलाडी जागा विचाराधिनराज्य विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु पर्यायी जागाच नसल्याने वरखेडीसह शहरातील नागरिकांना अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागत होत्या.शासनाकडून निधी उपलब्धहद्दवाढीतील गावांमध्ये कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळाल्याने प्रश्न धसास लागला आहे. घनकचरा संकलन व्यवस्थापनासाठी १८ कोटींचा ठेका नाशिक येथील खाजगी कंपनीस देण्यात आला असून घनकचरा व्यवस्थापनासाठी २५ कोटी रूपयांचा आराखडाही तयार झाला आहे़ कचरा संकलनासोबत त्यावर प्रकिया होण्यासाठी बायोमायनिंग व इतर कामांसाठी शासनाकडून ४ कोटी रूपये मंजूर झालेले आहेत़ लवकरच कचरा डेपोचे स्थलांतर मार्गी लागणार असल्याचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी सांगितले़डेपोच्या आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यातकचरा डेपोला आग लागल्याने अनेक शहरामध्ये दुर्घटना होऊन लाखो रूपयांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ मात्र वरखेडी कचरा डेपोला बाराही महिने आग लागते़ स्थानिक शेतकऱ्यांचा चारा, शेती पिकाचे नुकसान होत़ अधिकाऱ्यांकडून आगीचे कारण एकच सांगितले जाते गॅस तयार होऊन आग लागते़ मात्र ७६ टक्के स्थानिक नागरिक म्हणतात की, कचरा कमी होण्यासाठी डेपोला आग लावली जाते़ व धुराचा त्रास सहन करावा लागतो़ त्यामुळे आगीचे कारण अधिकाऱ्यांच्या गुलदस्त्यात असल्याचे दिसुन येत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे