शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात तीन वेळा आंदोलने करूनही मनपा कर्मचाºयांना वेतनाची प्रतीक्षाच

By admin | Updated: February 28, 2017 00:04 IST

धुळे : महापालिका कर्मचारी समन्वय समितीने गेल्या तीन महिन्यात तीन वेळा कामबंद आंदोलन करूनही सध्या कर्मचाºयांना तीन महिन्यांच्या वेतनाची प्रतीक्षा आहे़

धुळे : महापालिका कर्मचारी समन्वय समितीने गेल्या तीन महिन्यात तीन वेळा कामबंद आंदोलन करूनही सध्या कर्मचाºयांना तीन महिन्यांच्या वेतनाची प्रतीक्षा आहे़ मार्चअखेर जवळ येत असल्याने एकीकडे कामाचा ताण वाढत असतानाच दुसरीकडे वेतन न मिळाल्याने कर्मचाºयांमध्ये हतबलता दिसून येत आहे़ महापालिकांना एलबीटीची तूट भरून काढण्यासाठी मिळणाºया अनुदानातून मनपा कर्मचाºयांचे वेतन दिले जाते़ मात्र, तीन महिन्यांपासून शासनाने एलबीटीचे अनुदान जाहीर न केल्याने मनपा कर्मचाºयांचे वेतनही रखडले आहे़  १८०० कर्मचाºयांचा प्रश्नधुळे महापालिकेला दरमहा वेतनावर साडेचार कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो़ मनपा फंड, कायम, रोजंदारी व स्वच्छता कर्मचाºयांसह कंत्राटी कर्मचाºयांचा त्यात समावेश आहे़ मात्र, शासनाने डिसेंबरपासून एलबीटीचे अनुदान जाहीर न केल्याने मनपा कर्मचाºयांचे वेतन होऊ शकलेले नाही़ मध्यंतरी कायम कर्मचाºयांना ३० हजार रुपये वेतन आयोगाचा फरक देण्यात आला होता़ राज्यात बहुतांश महापालिकांमध्ये एलबीटीच्या अनुदानातूनच कर्मचाºयांचे वेतन दिले जाते़ मात्र, अनुदान न मिळाल्याने सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे़संघटनेला आंदोलन महागातमहापालिका कर्मचारी समन्वय समितीने वेतनासह काही प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते़ नोटाबंदीनंतर संकलित झालेल्या १५ कोटी रुपयांच्या उत्पन्नातून साडेचार कोटी रुपये कर्मचारी संघटनेला देण्याचे प्रशासनाने मान्य केले होते़ मात्र, त्यानंतरही रक्कम न मिळाल्याने कर्मचाºयांनी पुन्हा कामबंद आंदोलन केले होते़ दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने आंदोलन संघटनेला महागात पडले होते़ त्यामुळे वेतनासाठी पुन्हा आंदोलन करणेही संघटनेला अशक्यप्राय होऊन बसले आहे़ त्यातच सेवानिवृत्त कर्मचाºयांचा प्रश्नही प्रलंबित असल्याने त्यांची संघटनाही आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे बोलले जाते़ त्यामुळे कर्मचाºयांचा वेतनप्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला एलबीटीच्या अनुदानाची प्रतीक्षा  आहे़ मार्चअखेर जवळ येत असल्याने प्रत्येक विभागाकडून वसुली करण्यासाठी नोटिसा बजावल् या जातात़ त्यामुळे प्रलंबित देणी द्यायची की, कर्मचाºयांचे वेतन करायचे? असा प्रश्न प्रशासनाला आहे़ कामाचा अतिरिक्त ताण़़़मार्च महिना अर्थात आर्थिक वर्षाची समाप्ती जवळ आल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढला आहे़ आधीच बहुतांश अधिकारी व कर्मचाºयांवर अतिरिक्त जबाबदारी असताना कामाचा ताण वाढला आहे. असे असताना वेतन न झाल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होऊ शकतो़ त्यातच प्रशासनाने शास्ती माफीची मोहिम राबविण्यास सुरूवात केल्याने कर्मचाºयांवरील ताणात भर पडली आहे़