शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या आवारात वकिलास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:23 IST

गुन्हा दाखल : वकील संघाकडून निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कागदपत्रांची फाईल वकील पाहत असताना त्याला विरोध करत त्यांना मारहाण झाल्याची घटना शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी वकील संघाकडून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे़ तर संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ एका सोसायटीतील अपहार प्रकरणात फिर्यादी अनिल गंजीधर पवार आहेत़ तर या प्रकरणातील आरोपींचे अ‍ॅड़ संजय बाविस्कर हे वकील आहेत़ या अनुषंगाने बाविस्कर फाईल बघत असताना त्याला विरोध करण्यात आला़ यावेळी शाब्दीक चकमक देखील झाली़ यानंतर न्यायालयात आवारात त्याचे पडसाद उमटले आणि अ‍ॅड़ बाविस्कर यांची गच्छी धरुन त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्नही झाला़ घटनेचे गांभिर्य ओळखून अन्य वकीलांनी हे भांडण सोडविले़यानंतर हे प्रकरण थेट शहर पोलीस ठाण्यात पोहचले़ याठिकाणी अ‍ॅड़ संजय बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित अनिल गंजीधर पवार याच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या घटनेचे पडसाद न्यायालयात उमटले़ तातडीने धुळे वकील संघाची बैठक घेण्यात आली़ यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप पाटील, अ‍ॅड़ विवेक सूर्यवंशी, अ‍ॅड़ अमित दुसाने, अ‍ॅड़ गजेंद्र भदाणे, अ‍ॅड़ राजेंद्र गुजर, अ‍ॅड़ अतुल भारती, अ‍ॅड़ राहुल येलमामे, अ‍ॅड़ शैलेश राजपूत, अ‍ॅड़ सुनील देवरे, अ‍ॅड़ अतुल जगताप, अ‍ॅड़ प्रतिभा मोरे, अ‍ॅड़ पल्लवी गायकवाड यांच्यासह अन्य उपस्थित होते़ बैठकीत मारहाण घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला़ वकील बांधवांची सुरक्षितता यावर देखील चर्चा करत असताना अ‍ॅडव्होकेट प्रोटेशन अ‍ॅक्टची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली़ मारहाण करणारा अनिल गंजीधर पवार याचे वकीलपत्र कोणीही स्विकारणार नाही आणि यासंदर्भात पुढील ठोस भूमिका सोमवारी ठरविली जाईल़ - अ‍ॅड़ दिलीप पाटीलअध्यक्ष, वकील संघ, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे