धुळे : जिल्ह्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पायी चालणाऱ्या इसमाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो मृत्यूमुखी पडला. वाहनचालक वाहनासह फरार झाला.
धुळे तालुक्यातील सरवड लामकानी रस्त्यावर सप्तश्रृंगी मंदिराजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने संदीपकुमार विश्वासराव बोरसे (३४, रा. सरवड ता. धुळे) याला जोरदार धडक दिली. शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमाराला हा अपघात झाला. याप्रकरणी सुयोग भानुदास बोरसे (३०, रा. सरवड) याने दिलेल्या फिर्यादीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ), २७९, सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड काॅन्स्टेबल अहिरे करीत आहेत.
दरम्यान, अन्य एक अपघात अजंग ता. धुळे गावाजवळ १६ जून रोजी सायंकाळी झाला होता. पारोळाकडून धुळ्याकडे येणाऱ्या भरधाव वेगातील कारने धुळ्याकडून पारोळाकडे जाणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने खुशालचंद्र दाैलतराव महाले (४५, रा. वाडीभोकर, धुळे) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संभाजी वाल्मिक पाटील (४२, रा. नगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी कार चालकाविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. कोते करीत आहेत.