शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ३५१ कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:52 IST

ग्रामबालविकास केंद्रात दाखल केले तीव्र कुपोषित बालक, नियमित आहार दिला जातो

ठळक मुद्देजिल्ह्यात २२७ ग्रामबालविकास केंद्र सुरूकुपोषित बालकांना दिला जातो नियमित आहार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील तब्बल पावणेदोन लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून जिल्ह्यात ३५१ तीव्र तर १ हजार ३२३ बालके मध्यमस्वरूपाचे कुपोषित बालके आढळून आले आहेत. तीव्र कुपोषित असलेल्या बालकांचे वजन वाढवून त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यातील २२७ ग्रामबालविकास केंद्रात दाखल केले आहे. या बालकांना अतिरिक्त आहार देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील एकात्मिक बालविकास विभागातून देण्यात आली.धुळे जिल्ह्यात असलेल्या महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयांतर्गत २१०४ अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील १ लाख ७३ हजार ८०६ बालकांची सुरुवातीला अंगणवाड्यांमधील पर्यवेक्षिकांमार्फत वजन तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या बालकांची पुन्हा आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. त्यात ३५१ बालके तीव्र कुपोषित आढळले. ते वजन, वय व उंचीच्या प्रमाणात कमी आढळले.तीन महिने ठेवणारकमी वजन असलेल्या बालकांचे वजन वाढवून त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यात ग्रामबालविकास केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामबालविकास केंद्रात शुन्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना दाखल करण्यात येते. पूर्वी एकच महिना तीव्र कुपोषित बालक बालविकास केंद्रात असायचा.आता मात्र या बालकांना तीन महिने या केंद्रात ठेवण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी दहा प्रकल्पांतर्गत २२७ ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. या बालकांना नियमित आहार दिला जात आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे