शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन येथे राहणारे शत्रुघ्न गोकुळ गायकवाड (३५), दिलीप भिकला पावरा (३५), (रा. हाडाखेड, नवापाडा, ता. शिरपूर) हे बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमपी ४६ एमबी ८९६९ या क्रमांकाच्या मोटारसायकलीने शिरपूरकडून सेंधव्याकडे जात होते. त्याचवेळेस त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एमएच १८ एजी ८५९६ क्रमांकाच्या मोटारसायकलीने त्यांना धडक दिल्याने शत्रुघ्न गायकवाड व दिलीप पावरा हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर एमएच १८ एजी ८५९६ याच मोटारसायकलीने आणखी थोडे पुढे जात एमपी ४६ एमजे ४२८९ या क्रमांकाच्या मोटारसायकलीला धडक दिली. यात दिनेश वेडू चौरे (२७) आणि आसमाबाई दिलीप पावरा (३८) (दोघे रा. झेंडेअंजन, ता. शिरपूर) हे जखमी झाले. या अपघातप्रकरणी दिनेश चौरे याने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
दुचाकींची धडक, दोन जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST