पाटीलवाडा-
शहरातील पाटीलवाडा येथील हनुमान मंदिर बरेच जुन्या काळातील असल्याचे सांगितले जाते. शिरपूर शहराची स्थापना झाली त्या काळापासून येथे हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचठिकाणी नवीन मंदिर उभारले आहे. विशेष म्हणजे एकाच दगडावर हनुमानाच्या दोन मूर्ती असलेले एकमेव मंदिर आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक मोहन हुलेसिंग पाटील, भूपेश पाटील, हेमंत पाटील, बंडू बडगुजर, राजू पाटील यांनी केले आहे.
पाताळेश्वर मंदिर-
शहरातील पाताळेश्वर मंदिरात असलेल्या हनुमान मंदिरातही जयंतीचा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा होईल.
मराठे गल्ली- शहरातील मराठे गल्लीत हनुमान मंदिर असून मोठ्या श्रद्धेने भाविक दर्शनासाठी येत असतात़
निमझरी नाका
शहरातील निमझरी नाकाजवळील गणपती मंदिरात श्री हनुमान मंदिर आहे. याशिवाय बारी गल्लीतील मारोती मंदिर, बस स्टॅण्डजवळील रतन खंडू महाजन यांच्या घराजवळील मंदिर आदी ठिकाणी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे़
चौधरी गल्ली
चौधरी गल्लीत देखील इच्छापूर्ती हनुमान मंदिरात संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे़
लौकी
लौकी शिवारातील अशोक कलाल यांच्या शेतात हनुमानाचे जागृत मंदिर आहे़ अभिषेक, आरती, जन्मोत्सव व त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आहे़ मंदिर आकर्षक बांधण्यात आले असून त्याठिकाणी झाडे लावून परिसर सुशोभित केला आहे़ लौकी, करवंद व शिरपूर येथील भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी गर्दी करतात़
खर्दे बु़
खर्दे बु़ रस्त्यावरील शनिमंदिराजवळील संकटमोचन हनुमान मंदिर असून त्याठिकाणी देखील कार्यक्रम केले जातात़
आमोदा
गावाच्या शिवारात असलेल्या लाकड्या हनुमान मंदिरात भक्त मंडळातर्फे दर शनिवारी महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो़ हनुमान जयंतीला महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो़ हे मंदिर जागृत असल्याचे सांगितले जाते. मंदिर किती वर्षाचे जुने आहे ते नक्की सांगता येत नसले तरी १५० ते २०० वर्षांपूर्वीचे ते मंदिर असावे असे सांगण्यात आले.
वरवाडे
येथील संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो़
उंटावद
येथील मारोती मंदिर हे लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी बांधले आहे. या मंदिरात श्री गणेश, विठ्ठल-रुक्मिणी, प्रभू रामचंद्र, सीतामाता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत.
कुरखळी
येथील श्री दत्तप्रभू मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त अभिषेक, पूजा, आरती, महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो़
नागेश्वर मंदिर-
शिरपूर-चोपडा मार्गावरील अजनाड गावाजवळील नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी हनुमान मंदिर आहे़