शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड विभागाचे काम केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 16:15 IST

धुळे : कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भूमिका महत्वाची राहिली आहे. शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी ...

धुळे : कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भूमिका महत्वाची राहिली आहे. शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोरोना काळात अहोरात्र रुग्ण सेवा केली आहे. मात्र त्यांना त्यासाठीचा अतिरिक्त भत्ता न मिळाल्यामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ५० डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मंगळवार पासून डॉक्टरांनी कोविड विभागातील काम बंद केले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरूच होता. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.कोरोनाच्या काळात बऱ्याच ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासत होती. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आंतर्वासीता करीत असलेल्या डॉक्टरांनी कोरोना काळात कोविड विभागात सेवा दिली होती. त्यासाठी त्यांना अतिरिक्त भत्ता देणार असल्याची घोषणा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.मात्र नुकताच अतिरिक्त बत्त्याबाबतचा प्रस्ताव अर्थ खात्याकडून फेटाळण्यात आला असल्याने अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.संघटनेचा दावा - संघटनेने दावा केला आहे कि, २२ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याउलट अर्थ मंत्रालयाने अतिरिक्त भत्ता देण्यास नकार दिला असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या अस्मी या संघटनेने दिली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजावर या डॉक्टरांच्या संपामुळे परिणाम झाल्याचा जाणवतो. शासनाने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या आवश्यक त्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.