लस उपलब्ध करा
धुळे : शिंदखेडा येथे कोरोनाच्या लस संपल्याने लसीकरण बंद झाले आहे. लसचा साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करणारे निवेदन शिंदखेड्याचे नगरसेवक सुरज देसले यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिले.
एटीएममध्ये कचरा
धुळे : शहरात विविध ठिकाणी विविध बॅँकाचे एटीएम आहेत. मात्र एटीएमच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले आहे. अनेक एटीएममध्ये कागदाचे तुकडे पडलेले असतात. ते नियमित उचलले जात नाही. एटीएमच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
पार्किगची सोय व्हावी
धुळे : शहरात वाहने पार्क करण्यासाठी सुविधा नसल्याने बाजारपेठेमध्ये अतिशय बेशिस्तपणे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्यासाठी पार्किंगची सुविधा हवी.
पथदिवे सुरु
धुळे : एकीकडे शहरात काही भागांमध्ये रात्री पथदिवे बंद असल्याने अंधार असतो तर दुसरीकडे काही भागात मात्र दिवसा देखील पथदिवे सुरु असून विजेची उधळपट्टी होत आहे. ढाके नगरात दिवसा पथदिवे सुरु होते.