शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

गांधी परिवाराच्या तिस-या पिढीची आज सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:55 IST

एसएसव्हीपीएस कॉलेजचे मैदान । यापुर्वी या ठिकाणी येऊन गेल्या इंदिरा गांधी, सोनिया गांधी

आठवणींना उजाळादेवेंद्र पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे मैदान आणि त्यावर होणारी सभा ही काँग्रेससाठी नेहमी फलदायी ठरली असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ धुळ्यात यापुर्वी याच मैदानावर काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि आता धुळ्यात येणारे राहुल गांधी यांची सभा होत आहे़ साहजिकच काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे़ इंदिरा गांधीची सभाधुळे आणि नंदुरबार जिल्हा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे़ आजवरचा इतिहास आणि धुळ्यातील एसएसव्हीपीएस कॉलेज अर्थात श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे मैदानावरील झालेल्या विविध सभांद्वारे हे चित्र प्रतिबिंबीत होत आहे़ १९७८ मध्ये राज्याचे माजी मंत्री रोहिदासदाजी पाटील हे पहिल्यांदाच मंत्री झाले होते़ त्याच काळात इंदिरा काँग्रेसची देखील स्थापना झाली होती़ पक्षाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्वत: तत्कालिन काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिराजी गांधी धुळ्यात आल्या होत्या़ एसएसव्हीपीएस कॉलेजचे मैदान अगदी तुडूंब भरले होते़ हेलिकॉप्टरने आलेल्या इंदिराजींनी हेलिपॅड नसल्यामुळे हेलिकॉप्टर खाली उतरवून अगदी ३ ते ४ फुटावरुन थेट खाली उडी मारली होती़ त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करुन स्वत: एकट्या गर्दीतून वाट करत व्यासपिठाकडे मार्गस्थ झाल्या होत्या़ इंदिराजींचे भाषण आणि सडेतोड बोलणे ऐकण्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांनी प्रचंड अगदी उत्स्फुर्तपणे गर्दी केली होती़ सभा आटोपल्यानंतर त्या मालेगावकडे रवाना होण्यापुर्वी त्यांनी काँग्रेस भवनात सदिच्छा भेट दिली होती़ यावेळी त्यांचे तत्कालिन खासदार चुडामणअण्णा पाटील यांच्यासह पदाधिकाºयांनी जोरदार स्वागत केले़ सोनिया गांधीची सभायाशिवाय इंदिरा गांधी यांची सून काँग्रेसच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील याच मैदानावर येऊन सभा गाजविली होती़ सडेतोड बोलणे ऐकण्यासाठी सुध्दा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांनी गर्दी केली होती़ विशेष म्हणजे या मैदानावर घेण्यात आलेल्या सभेनंतर विजय हमखास झाल्याचा इतिहास आहे़ राहुल गांधीची सभाआता तीच पुनरावृत्ती काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी याच मैदानावर सभा होत आहे़ त्यांच्या रुपाने गांधी परिवाराची तिसरी पिढी धुळ्यात सभा घेत असल्याचे स्पष्ट आहे़ इंदिरा गांधी नंतर आता राहुल गांधीची सभातत्कालिन काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांची सभा झाल्यानंतर तब्बल ४१ वर्षाच्या कालावधीनंतर आता राहुल गांधी यांची सभा या मैदानावर होत आहे़ तसेच राजीव गांधी यांचा सोनगीरला कार्यक्रम झाला होता़ या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे