शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विरखेलजवळील तीन पाझर तलाव फुटल्याने ‘पांझरेला’ मोठा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 21:45 IST

धुळे जिल्हा : अक्कलपाडातून ३२ हजार क्यूसेस पाणी सोडले, सर्तकतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  साक्री, पिंपळनेर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे  सोमवारी विरखेल परिसरातील तीन पाझर तलाव फुटले. त्यामुळे  गटखल नदीला पूर आला. ते पुराचे पाणी गांगेश्वरजवळ येऊन मिळाल्याने पांझरा नदीला पूर आलेला आहे. त्यात सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने   अक्कलपाडा धरणातून सध्यस्थितीत २२ हजार क्यूसेस पाणीचा प्रवाह सुरू असतांना  सायंकाळी आणखी १४ हजार  क्यूसेस पाणी  सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकूण ३६ हजार क्यूसेस पाणी नदीत प्रवाहीत पांझरेला रात्रीतून आणखी मोठा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. तालुक्यातील  विरखेल गावालगत असलेल्या लेंडी धरण असून त्यावर तीन पाझर तलाव फुटले असल्याने लेंडी धरणात प्रचंड जलसाठा वाहून आला आहे. यामुळे गटखल नदीला मोठा पूर आला.  पुढे हे पाणी गांगेश्वर येथे पांझरा नदीला येऊन मिळाले आहे. त्यात पश्चिम पट्ट्यात जोरात सुरु असलेल्या पावसामुळे  रविवार पेक्षाही  जास्त पाणी पांझरा नदीत आले आहे. त्यामुळे नदीला मोठा पूर आला आहे. पुराचे पाणी शहरातील पांझरा नदी काठावरील आदिवासी वस्तीत शिरले आहे. तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.  यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले   आहे.*एकाला वाचविले*दरम्यान, रविवारी पुरात अडकलेल्या  घोडदे, ता.साक्री येथील  सुभाष सोनवणे (४०) याची ३० तासानंतर सुटका करण्यात प्रशासनाला यश लाभले. *दोन जण अजून बेपत्ता*साक्री तालुक्यातील काबºयाखडक प्रकल्पातून होणाºया विसर्गामुळे आलेल्या पुरात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बाळू शाहिराम ठाकरे(२१) व पंडित उलुशा गावीत (२६) दोघे जण वाहून गेले होते. त्यांचा दुसºया दिवशीही शोध लागलेला नव्हता. प्रशासन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात येत आहे. पिंपळनेर पोलिसांत ते हरविल्याची नोंद घेऊन याबाबत सर्वत्र सूचना देण्यात आल्याचे तपासाधिकारी के.आर. रणधीर यांनी सांगितले. 

टॅग्स :Dhuleधुळे