शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पतीसह तिघा आरोपींना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:52 IST

विटाई विवाहिता खून प्रकरण : आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी; नातेवाईक, ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी

पिंंपळनेर : विटाई ता.साक्री येथील किरणबाई खैरनार यांचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी त्यांचे पती शिवाजी खैरनार, दीर माधव खैरनार व दादाजी खैरनार यांना शुक्रवारी साक्री न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान मयत किरणबाई खैरनार यांची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीसह दिरांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आमखेल येथील त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केली आहे.साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक व तहसीलदार यांना त्या संदर्भात निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. १७ जून रोजी सकाळी आमखेल येथील माहेरवासीण किरणबाई खैरनार यांची विटाई, ता. साक्री येथील घरात पती शिवाजी पुंजाराम खैरनार, दीर माधव पुंजाराम खैरनार व दादाजी पुंजाराम खैरनार यांनी संगनमत करून घरातच किरणबाई यांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला होता. या दुर्दैवी घटनेसंदर्भात त्यांच्या माहेरी आमखेल येथे शोककळा पसरली होती. आजही हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती व दोघा दिरांना अटक केली आहे.आरोपींच्या फाशीची मागणीशुक्रवारी विटाई येथे किरणबाई खैरनार यांचा गंधमुक्ती व उत्तरकार्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आमखेल येथील ग्रामस्थ व नातेवाईक यांनी ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर लिहिलेल्या मागण्यांचे निवेदन देऊन तिघा आरोपींविरोधातील खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे.पोलीस उपाधीक्षक देविदास ढुमणे यांना निवेदन देताना आमखेलचे उपसरपंच ज्ञानेश्वर पवार, बहीण कल्पना प्रकाश देवरे व नितीन बेडसे यांनी घटनेचे गांभीर्य सांगत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या साठी साकडे घातले. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन ढुमणेंनी दिले. नातेवाईक व ग्रामस्थांनी तहसीलदार संदीप भोसले यांनाही निवेदन देत वरिष्ठ स्तरावर पाठवून न्याय मिळवून देण्याची मागणी आमखेल येथील मोरे, पवार, नांद्रे, ठाकरे परिवारांसह ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने आप्तेष्ट व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पती शिवाजी खैरनार, माधव खैरनार, व दादाजी खैरनार यांना शुक्रवारी साक्री न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यामुळे त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे