शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दराअभावी हजारो टन कांदा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:26 IST

साक्री तालुका : हंगाम चुकू नये म्हणून नवीन लागवडीला सुरुवात, जलपातळी घटली

लोकमत न्यूज नेटवर्कधमनार : कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. तसेच हंगाम चुकू नये म्हणून नवीन लागवडीला सुरुवातही केली आहे. मात्र, विहिरींची पाण्याची पातळी घटत असल्याचे चित्र दिसत आहे.नवरात्रीच्या कालावधीत उन्हाळी कांद्याला तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेर येथे दीड ते दोन हजार रुपयेपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र, आठवड्यानंतरच कांद्याचा दर दोनशे ते तीनशे रुपयांनी दररोजच घसरू लागल्याने कांदा उत्पादकांमध्ये चिंता पसरली. त्यातच दिवाळीत आठवडाभर कांदा खरेदी बंद होती. जुलै- आॅगस्ट महिन्यात कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने दरवाढीच्या अपेक्षेने शेतकºयांनी चाळीत साठवण केलेला कांदा काढलाच नाही. आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्येही तीच स्थिती असल्याने व सध्या प्रतिक्विंटल दीडशे ते तीनशे रूपये भाव उन्हाळी कांद्याला मिळत असल्याने आधीच कमी पावसामुळे दुष्काळाचे चटके सहन करणारा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.साक्री तालुक्यातील  धमनार, वसमार, दातर्ती, शेवाळी, बेहेड, कासारे, काटवान परिसरात, चिकसे-जिरापूर शिवारात उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला जातो. मात्र, पुरेशा दराअभावी आतापर्यंत एकूण कांद्यापैकी ६५ ते ७० टक्केच कांदा येथील शेतकºयांचा विकला गेला आहे. अजूनही साधारणत: दीड हजार टन उन्हाळी कांदा गावातील शेतकºयांकडे शिल्लक आहे. मात्र, कांदा सडण्याच्या समस्येबरोबरच कांद्याचे वजन कमी होणे, कांद्याला अंकूर फुटणे व काजळी चढणे अशा समस्या निर्माण होत आहेत.शेतकºयांची नाराजीकांद्याचा दर न वाढण्यास शेतकरी सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणास जबाबदार मानत असून विविध सोशल मिडीयावरून  नाराजी व्यक्त करीत आहेत. कांदा उत्पादकांची गळचेपी सरकारने केली असून शेतकरीविरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी खचला असल्याची भावना शेतकºयांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे. याचा फटका सरकारला पुढील निवडणुकांत बसेल, असेही भाजीपाला व इतर पिकांच्या दराने निराश झालेला शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.जलपातळी खालावलीचिकसेत नवीन कांदा लागवडीला सुरूवात झाली आहे. मात्र, विहिरींची जलपातळी खालावली आहे. नविन लागवडीचा हंगाम चूकवू नये म्हणून गेल्या हंगामाचा उन्हाळी कांदा शिल्लक असताना व खरीप पिकही पुरेसे आलेले नसताना येथील शेतकºयांनी कांदा लागवडीचा हंगाम सुरू केला आहे. आठवडागणिक विहिरीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. म्हणून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी शेतकरी लागवड क्षेत्रात ठिबकसिंचन करून घेत आहेत. येथील बहुतांश शेतकरी नासिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यासह कळवण, देवळा तालुक्यातूनही नातेवाईकांकडून लागवडीयोग्य तयार रोप उपलब्ध करून लागवड करीत आहेत. नासिक जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या विहिरी आटल्याने साक्री तालुक्यातील शेतकºयांना रोप विक्री करून किंवा मोफत रोप पुरवठा करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे