शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गोंदूर विमानतळावर कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 21:56 IST

राहुल गांधींचा धुळे दौरा : माजी मंत्र्यांनाही विचारले, आहे का गेट पास!, बंदोबस्त तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी सभेनिमित्त मुंबई येथून धुळ्यात विमानाने येणार असल्याने गोंदूर विमान तळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता़ तपासणी आणि गेट पास नसलेल्यांना विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला़ यात माजी मंत्री देखील सुटले नाही़ आतमध्ये केवळ मोजक्याच लोकांना प्रवेश दिला होता़ श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती़ त्यानिमित्त राहुल गांधी हे मुंबई येथून स्पेशल विमानाने मोजक्या प्रमुख पदाधिकाºयांसमवेत धुळ्यात दाखल झाले़ तत्पुर्वी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील पुढारी विमानतळावर ठाण मांडून होते़ त्यात माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री डॉ़ शोभा बच्छाव, सरचिटणीस ललिता पाटील, आमदार अमरिशभाई पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितराजे भोसले यांच्यासह अन्य पदाधिकाºयांचा समावेश होता़ विमानतळावर येणाºयांना विशिष्ठ पदाधिकाºयांना गेट पास देण्यात आला होता़ हे पास कोणाला दिले आहेत, त्याची यादी घेऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विमानतळाच्या गेटवर बंदोबस्तासाठी तैनात होती़ ज्यांच्याकडे पास असेल आणि त्यांचे नाव दिलेल्या यादीत असेल अशांनाच प्रवेश दिला जात असताना त्यांची देखील कसून तपासणी केली जात होती़ माणिकराव गावित विमानतळावर दाखल झाले़ त्यांच्याकडे पास असला तरी तो सभास्थळाचा होता, विमानतळाचा नसल्याने त्यांना गेटजवळच अडविण्यात आले़ त्यांना विमानतळावर जावू दिले जात नव्हते़ शेवटी वाद न घालता ते पुन्हा माघारी फिरले आणि आपल्या वाहनात बसले़ त्याचवेळी पोलीस धावत त्यांच्याकडे आले आणि एक कर्मचारी त्यांच्या वाहनात बसून त्यांना विमानतळावर घेऊन गेला़ त्यानंतर राहुल गांधींचे विमान धावपट्टीवर उतरले़ पुष्पगुच्छ देवून स्वागत केल्यानंतर त्यांना घेऊन वाहनांचा ताफा सभास्थळाकडे रवाना झाला़ अडथळा ठरु नये यासाठी रस्त्यावरील वर्दळ थांबविण्यात आली़

अवघे २८ मिनिटांचे भाषण :-

गोंदूर विमानतळावर ३ वाजून १५ मिनीटांनी धुळ्यात आगमऩ ३ वाजून २० मिनीटांनी सभास्थळाकडे रवाना़ ३ वाजून ३० मिनीटांनी सभास्थळी दाखल़४ वाजून २२ मिनीटांनी नमस्काराने भाषणाला केली सुरुवात़५ वाजता विरोधकांचा समाचार घेत भाषणाचा केला समारोप़ ५ वाजून ५ मिनीटांनी गोंदूर विमानतळाकडे रवाना़ ५ वाजून १५ मिनीटांनी विमानाने मुंबईकडे प्रयाण़

टॅग्स :Dhuleधुळे