शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहर हद्दवाढीत दुपटीपेक्षा अधिक क्षेत्र वाढणार

By admin | Updated: May 28, 2017 16:17 IST

सध्याच्या क्षेत्रफळात 62़51 चौरस वर्ग किमी क्षेत्राचा समावेश प्रस्तावित

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.28-शहर हद्दवाढीचा अंतिम  प्रस्तावानुसार शहराच्या सध्याच्या क्षेत्रफळात 11 गावातील 62़51 चौरस वर्ग किमी क्षेत्राचा समावेश करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आह़े
सध्या धुळे शहराचे क्षेत्रफळ 46़46 चौरस वर्ग किमी असून हद्दवाढीत 62़51 चौरस वर्ग किमी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आह़े त्यामुळे प्रस्तावित क्षेत्रात शासनाकडून बदल न झाल्यास धुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ दुपटीपेक्षा अधिक अर्थात 108़97 चौरस वर्ग किमी होणार आह़े 
सुधारित प्रस्ताव सादर
शहर हद्दवाढीबाबत यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी ए़ बी़ मिसाळ यांनी महिंदळे, भोकर, नकाणे आणि वलवाडी ही चार गावे पूर्णत: व 12 गावांचा अंशत: समावेश करावा असा अभिप्राय देऊन प्रस्ताव शासनाला सादर केला होता़ त्याबाबत गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली होती़  या बैठकीत आमदार अनिल गोटे यांनी हद्दवाढीच्या प्रस्तावित क्षेत्रात वाढ करण्याची मागणी केली होती़ त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित गावांमधील एनए क्षेत्राचा समावेश करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होत़े त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीस शहर हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर झाला आह़े 
पाच गावे वगळली!
शासनाला पूर्वी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात 16 गावे समाविष्ट  होती़ मात्र, आता  16 गावांपैकी वडजाई, लळींग, कुंडाणे, बिलाडी, फागणे ही पाच गावे वगळण्यात आली आहेत.  शासनाने मनपा प्रशासनाकडून हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आलेल्या क्षेत्राचे सुधारित नकाशे व अनुषंगिक कागदपत्रांची मागणी केली होती़ त्यानुसार मनपाने शासनाला माहिती सादर केली असून येत्या काही दिवसांतच हद्दवाढीची अधिसूचना प्रसिद्ध होऊन हद्दवाढ लागू होण्याची शक्यता आह़े 
मनपा, जि़प़त विरोधाचा ठराव
शहर हद्दवाढीस विरोध करीत महापालिकेनेच 7 सप्टेबर 2015 ला हद्दवाढीच्या विरोधात ठराव केला होता़ तत्पूर्वी जिल्हा परिषद व हद्दवाढीत त्यावेळी समाविष्ट असलेल्या 16 गावांपैकी 12 गावातील ग्रामपंचायतींनी देखील 15 ऑगस्ट 2015 ला घेण्यात आलेल्या ग्रामसभेत हद्दवाढीला विरोधाचा ठराव करून हरकती दाखल केल्या़ त्यामुळे तब्बल 150 हरकती शहर हद्दवाढीवर दाखल झाल्या होत्या व त्यावर सुनावणी देखील झाली होती़ मात्र शासनाने ठोस भुमिका घेत हद्दवाढ करणार असल्याचे स्पष्ट केले होत़े