शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याहून अद्याप मुंबईसाठी अद्यापही बस सुरूच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 11:22 IST

पुण्यासाठी दिवसभरात फक्त पाच बसेस

आॅनलाइन लोकमतधुळे : अनलॉकच्या चौथ्या टप्यात आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे. मात्र अजूनही राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसाठी धुळ्यातून एकही बस अद्याप सुरू झालेली नाही. तर पुण्यासाठी दिवसभरात फक्त पाच बसेस आहे. त्यामानाने औरंगाबाद, नाशिकसाठी पुरेशाप्रमाणात बसेस उपलब्ध आहेत.नाशिक, पुणे हे एस.टी. महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारे मार्ग समजले जातात. अनेक आगाराच्या बसेस याच मार्गावर धावत असतात.सध्या रेल्वेसेवाही सुरू नाही. त्यामुळे अनलॉकच्या टप्यात आता प्रवाशी महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. मात्र बसेसची अपुर्ण संख्येमुळे त्यांनाही नाईलाजास्तव खाजगी बससेवेकडे वळावे लागत आहे.आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुण्यासाठी फक्त पाच बसेस जात आह. यात अमळनेर आगाराच्या दोन, धुळे आगाराच्या दोन व शिरपूर आगाराच्या एका बसचा समावेश आहे.दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसाठी अद्यापही बस सुरू झालेली नाही. धुळेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातूनही मुंबईसाठी बसेस नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या भागातील प्रवाशांना मुंबईला जायाचे असल्यास त्यांना दोन टप्यातच प्रवास करावा लागत आहे.दरम्यान चोपडा आगाराची वाशी बस सुरू असून ती फक्त ठाण्यापर्यंत जाते. तर यावल, रावेर, धुळे, नंदुरबार, अक्कलकुवा येथून कल्याणसाठी बसेस उपलब्ध आहेत. मात्र थेट मुंबईपर्यंत एकही बस नाही. त्यामुळे धुळे आगारातून रात्रीच्यावेळेला मुंबईसाठी एक बस सुरू करावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे.नाशिकसाठी बसेस उपलब्धदरम्यान नाशिकला जाण्यासाठी सकाळी ५.३० वाजेपासूनच बसेस उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिकला जाण्यासाठी प्रवाशांना तूर्ततरी कुठलीही अडचण भासत नाही. तीच स्थिती औरंगाबादची आहे. या मार्गावरही पुरेशा प्रमाणात बस सुरू असल्याचे धुळे आगारातून सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे