शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २१९ पाणी योजना रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:50 IST

३२१ होत्या मंजूर : १०३ योजना मार्चअखेर पूर्ण करण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ४४ योजना तर भारत निर्माण कार्यक्रमातील १७५ योजना रखडल्या आहेत. यातील १०३ योजना या मार्च २०१८ अखेर पूर्ण करावयाचे उद्दिष्ट आहे. सर्वाधिक योजना या शहादा तालुक्यातील आहेत.  शासनाने गावाला नळपाणी पुरवठा योजना करता यावी, यासाठी २००५-०६ मध्ये भारत निर्माण कार्यक्रम सुरू केला होता. त्याशिवाय २०११ मध्ये राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यात जिल्ह्यातील ३२१ योजनांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक कामे अद्यापही अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे.भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००५-०६ मध्ये एकूण २३२ योजनांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात सर्वाधिक शहादा तालुक्यातील ७५ योजनांचा समावेश होता. २३२ पैकी केवळ १६ योजना पूर्ण करण्यात यश आले आहे. त्यात नंदुरबार तालुक्यातील आठ, नवापूर तालुक्यातील एक, शहादा तालुक्यात पाच तर अक्कलकुवा तालुक्यातील दोन योजनांचा समावेश आहे. भौतिक आणि आर्थिकदृष्ट्या १७५ योजना अपूर्ण आहेत किंवा त्यांचे कामच सुरू झालेले नसल्याचे चित्र आहे. त्यात नंदुरबार तालुक्यातील २५, नवापूर तालुक्यातील २७, शहादा तालुक्यातील ६१, तळोदा तालुक्यातील २५, अक्कलकुवा तालुक्यातील २५ तर धडगाव तालुक्यातील १२ ठिकाणच्या योजनांचा समावेश आहे. यापैकी ४१ योजनांची कामे ही प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मार्च २०१८अखेर एकूण ७० ठिकाणच्या योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत २०११मध्ये ८९ ठिकाणच्या योजनांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात नंदुरबार तालुक्यातील २०, नवापूर तालुक्यातील ५२, शहादा तालुक्यातील आठ, तळोदा तालुक्यातील पाच, अक्कलकुवा तालुक्यातील चार योजनांचा समावेश होता. त्यापैकी केवळ नंदुरबार व नवापूर तालुक्यातील अनुक्रमे दोन व दहा अशा एकूण १२ योजनाच पूर्ण करण्यात यश आले आहे.अपूर्ण काम असलेल्या योजनांमध्ये नंदुरबार तालुक्यातील सात, नवापूर तालुक्यातील ३१, शहादा तालुक्यातील चार, तर अक्कलकुवा तालुक्यातील दोन योजनांचा समावेश आहे. कामे प्रगतीत असलेल्या योजनांची संख्या ३३ इतकी आहे, तर मार्च २०१८ अखेर ३३ ठिकाणच्या योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.दरम्यान, सहा ते १२ वर्षांपासून मंजूर असलेल्या या योजनांचा खर्च आता दुपटीने वाढला आहे. मंजूर झालेल्या गावांमध्ये या योजनांची कामे वेळीच पूर्ण झाली असती, तर संबंधित गावांना दर वर्षाच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नसते. त्यामुळे आता उर्वरित अपूर्ण योजना तातडीने पूर्ण करून संबंधित गावाच्या ग्रामस्थांची पाण्यासाठीची होरपळ थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.