धुळे : शिंदखेडा तालुक्यातील बाभळे शिवारात नरडाणा औद्योगिक वसाहतीनजिक दगडी खाणीतून बेकायदा दगड चोरी करुन घेवून जाणारे तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कनिष्ठ अभियंता संजय कर्मा वसावे (४२) यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, वसावे हे पेट्रोलिंग करीत असताना २७ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून ट्रॅक्टर चालकाने सुमारे १० हजार रुपये किंमतीचे दगडं चोरुन घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार, एमएच १८ झेड ४८१, एमएच १८ एन ४७७७ आणि एमएच १८ झेड ८६३३ या तीन ट्रॅक्टर चालक आणि मालक यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
बाभळे शिवारात गौण खनिजची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 21:46 IST