शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तापी जलवाहिनीला बाभळेजवळ पुन्हा गळती!

By admin | Updated: May 29, 2017 12:59 IST

महापालिका : दुरूस्तीला महिना होण्यापूर्वीच गळत्यांची मालिका सुरू, पाण्याचा अपव्यय

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.29 - शहराच्या 60 टक्के भागाला पाणीपुरवठा करणा:या तापी जलवाहिनीला लागलेल्या 22 गळत्यांची दुरूस्ती होऊन महिनाभराचा कालावधीही झालेला नसतांनाच पुन्हा गळत्यांची मालिका सुरू झाली आह़े आधी नरडाणा, सोनगीर व आता बाभळे जलशुध्दीकरण केंद्राजवळ पुन्हा एकदा गळती लागली असून त्यातून उडत असलेल्या कारंजांमुळे ऐन उन्हाळयात पाण्याचा अपव्यय होत आह़े 
शहराला पाणीपुरवठा करणा:या तापी जलवाहिनीला लागलेल्या गळत्यांची दुरूस्ती करण्याचे काम मनपाने 3 मे रोजी हाती घेतले होत़े त्याकामी झालेल्या दिरंगाईमुळे अवघ्या शहराला कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ त्यामुळे मनपा प्रशासनावर चांगलीच टिकेची झोड उठली होती़  त्यानंतर पाणीपुरवठा काहीसा सुरळीत होत नाही तोच नरडाणा येथे पुन्हा मोठी गळती लागल्यामुळे पाणीपुरवठय़ाला पुन्हा विलंब झाला होता़ मनपाने त्यावेळी 22 लहान-मोठय़ा गळत्यांची दुरूस्ती केली होती़ मात्र दुरूस्तीला काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा सोनगीर येथे गळती लागली होती़ एवढेच नव्हे तर अवघ्या दोन दिवसांपूर्वी जलवाहिनीचा नळ सैल करून पाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने सोनगीरचे सरपंच, उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला़ त्यानंतर आता पुन्हा बाभळे जलशुध्दीकरण केंद्राजवळ गळती लागली असून त्यातून उंच कारंजा उडत आह़े नकाणे तलावातील जलसाठा संपुष्टात येत असल्याने पाटबंधारे विभागाने मनपा प्रशासनाला सुचित केलेले असतांना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय रोखण्याचे आव्हान मनपा प्रशासनाला पेलावे लागत आह़े सध्या नकाणे तलावात केवळ 23 दिवसांचा साठा शिल्लक आह़े