शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे मजीप्राच्या कार्यालयाला ठोकले ‘टाळे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 16:20 IST

स्थायी समिती सभापतींचे आंदोलन : प्रभागात रस्ता खोदूनही जलवाहिन्यांना विलंब

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.29- शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटींच्या पाणी योजनेंतर्गत एकविरा देवी मंदिरा रस्त्याला खोदकाम करूनही जलवाहिन्या न टाकल्याने मनपा स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवरंग जलकुंभ परिसरातील कार्यालयास  टाळे ठोकल़े जवळपास चार तास अधिकारी व कर्मचा:यांना कोंडून ठेवत सभापतींनी कार्यालयाबाहेरच ठिय्या देऊन तत्काळ काम सुरू करण्याची मागणी केली़
रस्त्याचे खोदकाम पण़़़
शहरात 136 कोटींच्या पाणी योजनेंतर्गत ठिकठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आह़े त्यानुसार एकविरा देवी मंदिर रस्त्यावर देखील ठेकेदाराने जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले होत़े मात्र खोदकाम होऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांचे हाल होत असून दारात खोदून ठेवण्यात आलेल्या खड्डयांमध्ये लहान मुले पडत आहेत़ शिवाय या रस्त्याने देवपूर अमरधाममध्ये अंत्ययात्रा जात असतात़ त्यामुळे अंत्ययात्रेत जाणा:या नागरिकांनाही रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सभापती कैलास चौधरी यांनी स्पष्ट केल़े 
स्थायी सभापतींचा ठिय्या!
स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला सकाळी 11 वाजता टाळे ठोकल़े त्यानंतर त्यांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन केल़े जोर्पयत काम सुरू होत नाही तोर्पयत अधिकारी व कर्मचा:यांना कार्यालयातून बाहेर येऊ देणार नाही, अशी भूमिका सभापती चौधरी यांनी घेतली होती़ दुपारी 4 वाजेर्पयत मजीप्राच्या कार्यालयाला टाळे होते व कर्मचारी आतमध्ये कामकाजात व्यस्त होत़े तर सभापतीही कार्यालयाबाहेर बसूनच होत़े