शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शिवदेंवर हल्ला करणाºया दोन्ही युवकांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:49 IST

निवेदन : भोई समाज महासंघाची पोलीस प्रशासनाकडे मागणी

धुळे : बालसुधार गृहातील (रिमांड होम) कर्मचाºयावर जीवघेणा हल्ला करीत पसार झालेल्या दोन्ही युवकांवर कठोर कारवाई करावी, बालसुधार गृहातील कर्मचाºयांना संरक्षण पुरविण्यात यावे, अशी मागणी धुळे जिल्हा भोई समाज महासंघाने केली आहे़ पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करीत पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली़ साक्री रोडवरील रिमांड होम येथे शिक्षा भोगत असलेले नंदुरबार येथील अल्पवयीन दोघा युवकांनी सोमवारी जेवण वाटप करणारे कर्मचारी आनंदा भिमराव शिवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत पळ काढला़ जखमी अवस्थेतील शिवदे यांनी इतर मुलांना एका रुममध्ये सुरक्षित बंद केल्यानंतर उपचारासाठी रुग्णालय गाठले़ वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले़ शिवदे यांच्यावर हल्ला करणारे दोन्ही अल्पवयीन मुले ही गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी़ तसेच रिमांडहोममधील कर्मचाºयांची संख्या वाढवून संरक्षक भिंतीची उंची वाढवावी, अशी मागणीही या निवेदनातून केली आहे़ शिवदे यांना न्याय न मिळाल्यास भोई समाज रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनातून दिलेला आहे़ पोलीस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर  भोई समाज महासंघाने निदर्शने केली़ यावेळी महासंघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, सचिव वसंतराव तावडे, सखाराम भोई, नाना वाडीले, मधुकर मोरे, चुडामण वाडीले, बन्सी वाडीले, निलेश खेडकर, पंडीत भोई, पंडीत मोरे, मयुर मोरे, कैलास मोरे, रामचंद्र मोरे, रुपेश मोरे, भिमराव वाडीले,  राहुल वाडीले, सुवालाल ढोले, अंकूश भोई, संतोष मोरे, ईश्वर मोरे, मनोज मोरे, मुकेश बेडकर, ए़ ए़ फुलपगारे आदी सहभागी झाले होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे