सोनगीर : येथील सुमारे ८०० वर्षांपूर्वीचा दक्षिण-उत्तर पसरलेला ऐतिहासिक सुवर्णगिरा किल्ल्याची दुरवस्था झालेली असून, याच्या दुरूस्ती, देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. याठिकाणी कुठल्याच सोयी-सुविधा नसल्याने, पर्यंकटकांनीही गेल्या काही वर्षात या किल्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.सुवर्णगिरी किल्ला उत्तम तटबंदी असलेला उत्तर-दक्षिण पसरलेला आहे. १२ व्या शतकात येथे यादवांचे राज्य होते. व उग्रसेन राज्याने हा किल्ला तयार केला अशी अख्यायिका आहे. पूर्वी या किल्यावर भरपूर संपत्ती व सोने होते त्यामुळे या किल्याला सुवर्णगिरी असे नाव ठेवण्यात आलेले आहे, असे जाणकार सांगतात. या ठिकाणी सासू-सुनेची भव्य विहीर, सभागृह, तोफा उडविण्याची जागा, मोठे भव्य दरवाजे, दहि जमविण्याचे पात्र, याचे केवळ अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले अवशेष पाहण्यासाठी नेहमी शाळकरी विद्यार्थी पर्यटक या ठिकाणी यायचे.मात्र गेल्या काही वर्षात या किल्ल्याची दुरवस्था झालेली आहे. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या ठिकाणी कुठ्लयाच सुविधा नसल्याने पर्यटकांनीही येणे बंद केलेले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक किल्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे.ऐतिहासिक महत्त्वल्ल १२व्या शतकात बांधलेला उत्तम तटबंदी असलेला या किल्याची जिल्ह्यात ख्याती होती.ल्ल किल्यावर सासू-सुनेची विहीर, तोफा उडविण्याची जागा बघण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातीलही पर्यटक येत होते.ल्ल जिल्हयातील अनेक शाळांच्या सहली या किल्यांवर जात होत्या.ल्ल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने, या किल्याला भेट देणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे.
सुवर्णगिरा कडे होतेय प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 13:42 IST