शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात वसतिगृहात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:56 IST

देवपुरातील घटना : घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील दत्तमंदिर ते स्वामी नारायण मंदिराच्या रस्त्यावर असलेल्या शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात एका तरुणाचा मृतदेह रविवारी रात्री संशयास्पदरित्या आढळून आला़ त्याचा कोणीतरी घातपात केला असावा असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे़ दरम्यान, हा तरुण वसतिगृहात अनधिकृतरित्या राहत असल्याचे समोर आले आहे़ प्रजेश गुलाबसिंग पावरा (२२, रा़ खुटवाडे ता़ शहादा) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे़ प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रजेश पावरा हा पुर्वी गंगामाई फार्मसी विद्यालयात बी फार्मसीचे शिक्षण घेत होता़ त्यावेळेच्या ओळखीमुळे तो दत्तमंदिर रस्त्यावरील आदिवासी वसतिगृहात वास्तव्यास होता़ वसतिगृहात त्याच्या उपस्थितीबाबत कोणतीही नोंद नव्हती़ सोमवारी रात्री आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत त्याने जेवण आटोपले़ जेवणानंतर पाणी पिण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खोलीबाहेर पडला़ त्यानंतर तो परत आलाच नाही़ बºयाच वेळानंतर विद्यार्थ्यांनी शोधा-शोध केली असता इमारतीच्या खालच्या बाजूस अंधारात तो बेशुध्दावस्थेत पडलेला आढळून आला़ यावेळी प्रजेश पावरा याच्या तोंडातून रक्त वाहत होते़ त्याला काही जखमीही झाल्या होत्या़ घटनेनंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रजेश याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ पण, तत्पुर्वीच प्रजेशचा मृत्यू झाला होता़ या घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोळी घटनास्थळी दाखल झाले़ घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला आहे़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ मृत प्रजेश पावरा याचा भाऊ सुकलालसिंग पावरा हा एसटी बसमध्ये वाहक म्हणून नोकरी करतो़ घटनेची माहिती मिळताच त्याने कुटुंबियांसह हिरे वैद्यकीय महाविद्यालय गाठले़ भावाचा कोणीतरी घातपात केला, घटनास्थळी रक्ताचे डाग होते, त्यामुळे सखोल चौकशीची मागणी केली.

टॅग्स :Dhuleधुळे