शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

संशयित नगरसेवकांची बाजू मांडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:56 IST

जळगाव घरकूल  प्रकरण : अ‍ॅड जितेंद्र निळेंचा प्रभावी युक्तिवाद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जळगाव घरकूल प्रकरणी संशयित नगरसेवकांची बाजू मांडताना अ‍ॅड़जितेंद्र निळे यांनी धुळेन्यायालयात मंगळवारी प्रभावीपणे युक्तिवाद केला़ विशेष न्यायाधीश डॉ़सृष्टी नीळकंठ यांच्या समोर जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज सुरु आहे़ मंगळवारी अ‍ॅड़जितेंद्र निळे यांनी न्यायालयात युक्तिवाद करून संशयित नगरसेवकांची बाजू मांडली़ या प्रकरणाचे फिर्यादी तथा तत्कालिन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी ऐकीव माहितीवरुन न्यायालयात साक्ष दिली असून ती साक्ष कायद्याने कशी ग्राह्य धरता येत नाही हे अ‍ॅड़ निळे यांनी पटवून दिले़ याशिवाय जळगाव नगरपालिकेतील घरकूल प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा लावण्यात येत असलेला आरोप कसा चुकीचा आहे हेही त्यांनी मुद्देसूद पटवून दिले़ तत्कालिन आयुक्त प्रवीण गेडाम हे पदावर असताना तत्कालिन नगरसेवकांनी शहरातील समस्या सोडविण्याबाबत मागणी केली होती़ मात्र, या समस्या सोडविण्यात गेडाम अकार्यक्षम ठरल्याने तत्कालिन नगरसेवकांनी गेडाम यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता़ या बाबीचा राग येऊन गेडाम यांनी तत्कालिन नगरसेवकांविरुध्द खोटा गुन्हा दाखल केला असावा, अशी शक्यता असल्याचे सांगून ही बाब अ‍ॅड़ निळे यांनी युक्तीवादाद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली़ महापालिकेचा कोणताही ठराव बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आल्यास तो विखंडीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांचे आहेत़ मात्र, त्या काळी पारित केलेले ठराव विखंडीत करण्यात आले नसल्याची बाबही अ‍ॅड.निळे यांनी मांडली. तसेच यापूर्वी खान्देश बिल्डर्सच्या माध्यमातून नगरपालिकेच्या क्षेत्रात अनेक घरकुले बांधण्यात आलेली असून त्यांचे काम यशस्वी झाली असून अनेक कुटुंबे त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत, हा मुद्दा अ‍ॅड़ निळे यांनी युक्तिवादात प्रकर्षाने मांडला़ 

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय