शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात स्वत: गळ्यावर ब्लेड मारुन घेत संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:10 IST

पोलिसांच्या वाहनातील प्रकार : गोवंश चोरी प्रकरण

धुळे : पोलिसांनी गोवंश चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने पोलिसांच्या वाहनात स्वत:च्या मानेवर ब्लेडने मारुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला़ याप्रकरणी गुरुवारी पहाटे मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़मुज्जमील हुसेन मोहम्मद इस्त्राइल अन्सारी (२९, काझी प्लॉट, वडजाई रोड, धुळे) या संशयिताला गोवंश चोरी प्रकरणात मोहाडी पोलिसांनी १५ जुलै रोजी चौकशीकामी ताब्यात घेतले होते़ त्याला अटक करण्यापुर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला एमएच १८ एफ ०१५१ या पोलिसांच्या वाहनातून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले़ रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याला परत घेऊन जात असताना मुज्जमील अन्सारी याने रुग्णालयातून जुने वापरलेले सर्जिकल ब्लेड उचलून घेतले होते़ पोलिसांचे वाहन त्याला घेऊन मुंबई आग्रा महामार्गावरुन घेऊन जात असताना अपना हॉटेलजवळ अन्सारीने लपवून आणलेल्या ब्लेडने स्वत:च्या मानेवर मारुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़घटनेचे गांभिर्य ओळखून वाहनात असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ अडविले़ स्वत:ला दुखापत करुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून मुज्जमील अन्सारी याच्या विरोधात गुरुवारी पहाटे सव्वा बारा वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी भूरा इंदा पाटील यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३०९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे