शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांची शोधवृत्ती अचंबित करणारी

By admin | Updated: January 12, 2016 00:49 IST

नंदुरबार : बालवैज्ञानिकांची शोधक वृत्तीची भरारी पाहणा:यांना अचंबित करणारी ठरली.

नंदुरबार : बालवैज्ञानिकांची शोधक वृत्तीची भरारी पाहणा:यांना अचंबित करणारी ठरली. अणुविज्ञान, सौर आणि जल उर्जा, अंतराळविज्ञान यासह इतर वैज्ञानिक क्षेत्रातील उपकरणे मांडून विद्याथ्र्यानी जिल्हा विज्ञान प्रदर्शनात लक्ष वेधून घेतले आहे. तीन दिवस चालणा:या या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत यांच्या व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

जिल्हास्तरीय 17 व्या विज्ञान प्रदर्शन कोठली आश्रमशाळेत सोमवारपासून सुरू झाले. औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हाभरातील शाळांमधून 104 उपकरणे सहभागी झाली आहेत. त्यात प्राथमिक गटातून 24, माध्यमिक गटातून 24, शिक्षक निर्मित अध्यापन साहित्याची प्राथमिक व माध्यमिकची प्रत्येकी सहा, लोकसंख्या शिक्षण प्राथमिकचे प्रत्येकी 18, प्रयोगशाळा सहायकनिर्मित उपकरण सहा, व्यवसाय मार्गदर्शन दोन अशा उपकरणांचा समावेश आहे. सहभागी उपकरणांमध्ये अंतराळ विज्ञान, अणुविज्ञान, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण यासह इतर विषयांवरील उपकरणांचा समावेश आहे. प्रत्येक तालुकास्तरावरील प्रदर्शनातून निवडण्यात आलेली उपकरणे जिल्हा प्रदर्शनात सहभागी झाली आहेत.

उद्घाटनपर भाषणात बोलताना खासदार डॉ.हीना गावीत यांनी सांगितले, विज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेऊन वैज्ञानिक दृष्टय़ा देशाच्या प्रगतीविषयी त्यांनी विविध उदाहरणे दिली. रोबेटिक सजर्री परदेशात बसून भारतात करता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शाळांमधूनही अशा उपक्रमांमधून नवनवीन प्रयोग हाताशी घेऊन लहान शास्त्रज्ञ तयार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवीन वस्तूंचा शोध लावून शोधवृत्ती, नावीन्यपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले, विद्याथ्र्याना त्यांच्या कलेनुसार वाव देऊन आवडत्या क्षेत्रात त्यांना प्रगती करू द्यावी. आश्रमशाळा, वसतिगृहांनी आपल्या इमारतींवर सोलर पॅनल उभारून वीज निर्मितीचा प्रकल्प राबवावा. प्रकल्प कार्यालयाने आश्रमशाळांमध्ये विशेषत: दुर्गम भागातील शाळांमध्ये असे उपक्रम राबविले तर त्यातून आदिवासी विद्याथ्र्याना ते सोयीचे होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी जी.एन.पाटील यांनी केले. त्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी उपकरणांची माहिती दिली.

या वेळी व्यासपीठावर सरपंच विलास वळवी, सहायक प्रकल्प अधिकारी आर.आर. पाटील, ए.आर. तांबोळी, माध्यमिक शिक्षणाधिकारी जी.एन.पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील उपस्थित होते.

या वेळी माजी जि.प.सदस्य प्रकाश गावीत, उपशिक्षणाधिकारी दिनेश देवरे, गटशिक्षणाधिकारी सी.के. पाटील, रमेश गावीत, किस्मत पाडवी, विष्णू गुरुजी, राजेंद्र शर्मा आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन दीपाली पाटील, उषा राजपूत यांनी केले. आभार सुनील भामरे यांनी मानले.