शिरपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच वाघाडी गटापाठोपाठ पळासनेर गटातील भाजपच्या उमेदवार बिनविरोध झालेल्या आहेत. पळासनेर गटातून सासू तारकीबाई पावरा यांनी माघार घेतल्याने सून मोगराबाई जयवंत पाडवी या भाजपच्या उमेदवार बिनविरोध झालेल्या आहे. या निवडीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.पळासनेर गटात मोगराबाई जयवंत पाडवी (भाजपा), मेदांबाई मंगेश पावरा (राष्ट्रवादी), तारकीबाई प्रताप पावरा (अपक्ष) अशा तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र मेंदाबाई पावरा यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्षांचे एबी फॉर्म जोडल्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला होता़ त्यामुळे सासू तारकीबाई पावरा व सुन मोगराबाई पावरा असे दोघांचेच अर्ज शिल्लक राहिले होते़ २६ डिसेंबर रोजी तारकीबाई पावरा यांनी माघार घेतल्यामुळे त्यांची सून भाजपच्या उमेदवार मोगराबाई पाडवी या बिनविरोध झाल्यात़ त्या ‘शिसाका’चे संचालक जयवंत पाडवी यांच्या पत्नी आहेत़ दरम्यान वाघाडी गट पाठोपाठ पळासनेर गटही बिनविरोध झालेला आहे. आता तालुक्यातील १४ पैकी दोन गट बिनविरोध झाल्याने आता १२ गटासाठीच निवडणूक होणार आहे. त्यातही ३० तारखेपर्यंत अजून काही गट बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भाजपने सर्व जागांवरदिले उमेदवारशिरपूर तालुक्यात १४ जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होत आहे़ १४ गटापैकी १० गट आरक्षित असल्यामुळे केवळ विखरण बु़ वनावल, शिंगावे व भाटपुरा असे चारच गट खुले प्रवर्गासाठी आरक्षित आहेत़ त्यातही वनावल हा गट महिला जागेसाठी आरक्षित आहे़आमदारद्वयीं विधानसभेच्या निवडणूक पूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात दाखल झाले होते़ त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपाचे कमळ फुलले़ होवू घातलेल्या जि़प़ निवडणूकीत सुध्दा यापूर्वी बोटावर मोजण्या एवढ्या जागा पटकाविणाऱ्या भाजपला आता चांगले दिवस आले आहेत़ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व म्हणजेच १४ जागांवर उमेदवार दिले होते. त्यातही वाघाडी व पळासनेर गट बिनविरोध करून तालुक्यात भाजपने विजयी सलामी दिलेली आहे.आता भाजपचे १२, राष्टÑवादी कॉँग्रेसचे सहा, काँग्रेस, शिवसेना, भाकप यांचे प्रत्येकी तीन-तीन तर महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तालुक्यात महाविकास आघाडी झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसने वेगळीच चुल मांडून केवळ तीन जागांवरच उमेदवार दिलेले आहेत़ तर राष्ट्रवादी व शिवसेना या दोघांनी मिळवून ९ जागांवर उमेदवार दिले आहेत़ अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.तर रोहिणी गटही बिनविरोध होऊ शकतोरोहिणी गटात कैलास हारसिंग पावरा (भाजप), प्रताप ढेडा पावरा (राष्ट्रवादी), कैलास दुरसिंग पावरा (अपक्ष) या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल होते़ मात्र छाननीत राष्ट्रवादीचे उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे कदाचित माघारीच्या दिवशी अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास हा गट देखील बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसे झाल्यास प्रथमच वाघाडी, पळासनेर व रोहिणी असे ३ गट बिनविरोध होतील़आता १२ गटासाठीच निवडणूक होणार आहे.
सासुने माघार घेतल्याने सूनबाई बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:20 IST