शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

जी-पॅट परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

जीपॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम. फार्मसीला) प्रवेश दिला जातो. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे ...

जीपॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम. फार्मसीला) प्रवेश दिला जातो. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मासिक १२ हजार ४०० रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता यावा व शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा हे जी-पॅट परीक्षेचे उद्दिष्ट आहे. जीपॅट-२०२१ परीक्षा २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात विविध केद्रांवर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. त्यात एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयातील एकूण ११ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

महाविद्यालयातील तुषार सैंदाणे (२५० गुण), अतुलसिंग ठाकूर (२२९), प्रिया चौधरी (१८८), दीप्ती पाटील (१८६), शिवाजी गावंडे (१८४), कल्याणी चौधरी (१८२), लीलाधर शेवाळे (१७९), नीशा पाटील (१७५), काजल पाटील (१५६), विजय पाटील (९२), दिलीप पावरा (९१) हे विद्यार्थी जीपॅट परीक्षेत उतीर्ण झाले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

एस. व्ही. के. एम.चे १४ विद्यार्थी

धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, मुंबई संचालित एस. व्ही. के. एम. औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्मसी) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट २०२१ (जीपॅट) च्या परीक्षेच्या निकालात पहिल्याच बॅचमधून तब्बल १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चतुर्थ वर्षातील विद्यार्थी जयेश राजेश पाटील ९९.४७ गुण मिळवून (ऑल इंडिया रँक २४१), प्रज्वल संजय निकम (११३१), विनय शरद देशमुख (१९१४), ऋषिकेश बबन महाजन, पायल सुनील गजघाटे, हर्षल संजय पाटील, शाश्वत महेश चांगले, पूनम योगेश पाटील, उज्वल गजानन सोनवणे, प्रज्ञा विजय जैन, तृतीय वर्षातील विकास धुमाळ, हेमाक्षी मुकेश कोळी, गायत्री शेखर शुक्ला, अविनाश पाटील हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या घवघवीत यशासाठी प्राचार्य डॉ. समीर गोयल, डॉ. उस्मान सिद्दिकी, प्रा. मृणाली पाटील यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

या यशासाठी एस. व्ही. के. एम. संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजगोपाल भंडारी, धुळे कॅम्पसचे डॉ. अजय पसारी, माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील आदींनी कौतुक केले.