शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना लागला विज्ञानाचा छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:38 IST

उपक्रम । घासकडबी शैक्षणिक संस्थेतर्फे उन्हाळ्याच्या सुटीत सुरू केला विज्ञान छंद वर्ग

धुळे : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांनीही वेगवेगळे प्रयोग स्वत: हाताळावेत, ते करावेत यासाठी घासकडबी शैक्षणिक संस्थेतर्फे उन्हाळी विज्ञान छंद हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमामुळे इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी विविध प्रयोग हाताळत असून, त्यांना विज्ञानाचा छंद लागलेला आहे.काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्याने, सर्वांनाच प्रयोग करण्याची संधी मिळत नाही. तर काही शाळांमध्ये विज्ञान प्रयोगाच्या उपकरणाची वानवा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ ‘प्रयोग’ बघावे लागतात. उन्हाळ्याची सुटी लागली की अनेकजण गावी जातात तर काहीजण घरातच मोबाईल गेम खेळण्यात मग्न असतात. या मिळालेल्या सुटीचा सदुपयोग व्हावा यासाठी घासकडबी शैक्षणिक संस्थेतर्फे उन्हाळी विज्ञान छंदवर्ग हा उपक्रम राबविण्यात येतो. या संस्थेत घासकडबी विज्ञान प्रयोगिका आहे. २००८पासून इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान छंद उपक्रम राबविण्यात येतो. सात दिवसाच्या कालावधीत विद्यार्थी स्वत: लहान, लहान प्रयोग करीत असातत. यात दोलकाचा दोलन काळ काढणे, श्वसनातून सीओटू वायू बाहेर पडतो हे पडताळणे, वेगवेगळ्या तापमानाच्या पाण्याचे तापमान तापमापीच्या साह्याने मोजणे, सुक्ष्म दर्शकाच्या साह्याने परागकणांचे निरीक्षण करणे, गोलाकार वस्तूमुळे पदार्थांचे घर्षण कमी होते हे पडताळून पाहणे, पाईपातून वर चढणारा ब्रश, दोऱ्याने ग्लास उचलणे, रांगाची गाळणी बनविणे, पिंजºयातील पोपट, पाण्यात जाणारा मासा असे विविध प्रयोग करण्यात येतात. तसेच या उपक्रमांतर्गत मजा गंमत म्हणून काही खेळ देखील घेण्यात येतात. यात गोलाकार फिरून उभी राहणारी बाटली, नाव, गाव, फळ,फूल, चित्र जोडणे, विद्यार्थी ग्रिटींगही तयार करीत असतात.देशबंधू मंजूगुप्ता फाऊंडेशनतर्फे मिळालेली फिरती प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना दाखविण्यात येते. यात न्युटनची चकती, रंगीत सावल्या, परिदर्शिका, पाण्याचा जादुई नळ, जडत्वाचा सिद्धांत, वर्तुळ आणि चेंडू, क्रिया प्रतिक्रिया, तरंगणारा पंखा, चक्रीवादळ, सौर प्रकाश, डीएनए रचना प्रतिकृती असे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांना दाखविण्यात येतात. विद्यार्थ्यांमध्येही विज्ञान प्रयोगाची प्रचंड आवड निर्माण झालेली आहे. विविध प्रयोग स्वत: हाताळत असल्याने, त्यांना विज्ञानाची माहिती तर होतेच, शिवाय त्यांना आनंदही घेता येत असतो. एका बॅचमध्ये जवळपास १५-१० विद्यार्थी सहभागी होतात. त्यांना दोन तासांचा अवधी दिला जात असतो. मात्र अनेक विद्यार्थी तेथून जाण्यासही तयार नसतात. या विद्यार्थ्यांना दीपाली दाभाडे व ललित कुळकर्णी हे मार्गदर्शन करतात. हा सर्व उपक्रम घासकडबी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र शहा, सचिव नरेंद्र जोशी, खजिनदार श्रीराम देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Dhuleधुळे