शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर अतिक्रमण; वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:08 IST

महापालिका : हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबित, धुळेकरांना वाहतुकीचे डोकेदुखी

धुळे : मु्ख्य रस्त्यांवर फेरीवाले, हॉकर्स व विक्रेत्यांनी अतिक्रमन केल्याने शहरातील प्रमुख रस्ते सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहेत़ मनपा व वाहतूक शाखेच्या लगर्जीपणाने धुळेकरांना मात्र वाहतूक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़महापालिकेने हॉकर्स झोनच्या प्रश्नावर चर्चा होऊन पाच जागा निश्चित करण्यात आल्या होत्या़ मात्र हॉकर्स झोनच्या प्रश्नाबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर हॉकर्सची संख्या वाढली आहे़ शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत पाच जागा निश्चित करण्यात आल्या होत्या़ त्यात साक्रीरोड वरील हॉकर्ससाठी मनपा शाळा क्रमांक १४, नकाणे रोड-जयहिंद कॉलनी व परिसरातील हॉकर्ससाठी आनंद नगरातील महापालिकेचा भुखंड, इंदिरा उद्यान परिसरातील फळ विके्रते व अन्य हॉकर्ससाठी, इंदिरा उद्यानामागील बोळ, दत्तमंदिर परिसरातील हॉकर्ससाठी नवरंग जलकुंभाशेजारील जागेऐवजी सुदर्शन कॉलनी येथील मोकळी जागा आणि मोहाडी परिसरातील हॉकर्ससाठी दसेरा मैदानाची जागा निश्चिती झाली होती़ मात्र त्यानंतर याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे हॉकर्स झोनचा प्रश्न अद्याप मार्गी लागू शकला नाही़जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे़ ते महापालिकेचे दैनदिन बाजार शुल्क भरण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे दरवर्षी मनपाच्या बाजार समिती विभागाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते़ हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी न लागण्याने शहरातील इलेक्ट्रीक खांब, झाडांच्या आधाराने अतिक्रमण करून केले़ सकाळी ७.३०, ११.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत शाळा सुटण्याच्या कालावधीत आग्रारोड, पारोळारोड, जयहिंद चौक, दत्त मंदिरसह व अन्य काही मुख्य रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूकीची कोंडी होते़ मात्र मनपा व वाहतूक शाखा वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे