जिल्ह्यासह शिरपूर तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांना कोरोना काळात बचत गटातून रोजगार निर्मिती होत नसल्यामुळे खाजगी फायनान्स कंपनीमार्फत दिले गेलेले कर्जाचे हप्ते महिला बचत गटातील महिलांना कोरोना काळात परतफेड करणे शक्य होत नाही. परंतु तरीदेखील खाजगी फायनान्स कंपन्यांमार्फत उदाहरणार्थ वंदना फायनान्स, आयडीएफसी फर्स्ट बँक फायनान्स, भारत फायनान्स, एल अँड टी फायनान्स, ग्रामीण कोटा फायनान्स, बजाज फायनान्स, महिंद्रा फायनान्स यांसारख्या अनेक खाजगी कंपन्या शिरपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात महिला बचत गटांकडून बळजबरीने हप्ते वसुली करीत आहेत. तरी ही कर्ज वसुली जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन त्वरित थांबवावी.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करावी, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून, एलडीएम यांच्याशी चर्चा करून यावर लवकरच तोडगा काढून महिला बचत गटांना दिलासा देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी डॉ. ठाकूर यांना दिले.