शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञाताकडून पिकावर तणनाशक फवारणी

By admin | Updated: July 14, 2017 23:50 IST

मका पिकाचे नुकसान : सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल; महसूल विभागाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे येथील सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले श्रीराम वामन पाटील (बोरसे) यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून पिकावर तणनाशक फवारणी करून शेतात लागवड केलेल्या मका पिकाचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून महसूल विभागाकडे त्यांनी तक्रार दिली आहे.  कापडणे येथील श्रीराम पाटील यांचे कापडणे-न्याहळोद शिवारात शेत आहे. ते त्यांच्या पत्नीसह शेती करतात. १ जूनला येथील शिवारात पावसाचे आगमन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतातील अडीच बिघ्यात मक्याची पेरणी केली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. या चिंतेत असताना अज्ञात समाजकंटकाने ९ जुलैला मध्यरात्री फवारणी केली होती. त्यात त्यांच्या त्यांच्या मका पिकाचे नुकसान झाले होते. पोलिसात व महसूल विभागात तक्रारत्यांच्या शेतात नुकसान करणाºयाविरुद्ध त्यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला श्रीराम पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून १० जुलैला गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात महसूल विभागालाही कळविले होते. अखेर गुरुवारी सर्कल विभागाकडून शेतातील पिकाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मंडळ अधिकारी भाग सोनगीर (सर्कल) डी. आर. ठाकूर यांनी रीतसर पंचनामा केला आहे. या वेळी कोतवाल भामरे, आबा नारायण पाटील, बारकू तोताराम पाटील , रवींद्र दगा पाटील, शिवाजी उत्तम पाटील, जयवंत यशवंत पाटील, अशोक नथ्थू पाटील, रामकृष्ण श्रावण पाटील, गोरख रामभाऊ बोरसे, पांडुरंग राजाराम पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.  दोन महिन्यांपूर्र्वीही माझ्या शेतावर रात्रीतून ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने पूर्ण तयार शेत भुईसपाट करण्यात आले होते. आता दुसºयांदा याच शेतात दोन महिन्यांनंतर दीड महिन्याच्या अडीच बिगा मका पिकावर अज्ञाताने तणनाशक फवारणी केली. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दोन्हीही वेळेस मी सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करूनही आजपर्यंत संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली नाही. मी स्वत: सेवानिवृत्त भारतीय सैनिक आहे. तरी मला न्याय मिळत नाही, हीच शोकांतिका आहे. - श्रीराम वामन पाटील, नुकसानग्रस्त शेतकरीश्रीराम पाटील यांच्या शेतात पंचनामा करताना मका पिकावर तणनाशक फवारणी केली आहे व अडीच एकर जमिनीवरील सर्व मका पीक करपून कोरडे पडलेले दिसले. त्यानुसार पंचनाम्याच्या अहवालात तशी नोंद केली असून संबंधित किती वर्षांपासून शेती करीत आहे, याचीही नोंद घेतलेली आहे.     - डी.आर. ठाकूर, मंडळ अधिकारी, सोनगीर