शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सोरापाडय़ात शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी

By admin | Updated: January 1, 2016 00:12 IST

शेतीच्या वादातून सोरापाडा, ता.अक्कलकुवा येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाले.

नंदुरबार : शेतीच्या वादातून सोरापाडा, ता.अक्कलकुवा येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातर्फे परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

पोलीस सूत्रांनुसार, सोरापाडा येथील सूरज जयसिंग वळवी व रवींद्र देवीदास सोनवणे यांच्यात शेतीचा वाद होता. शेती पाहण्यासाठी बँकेचे अधिकारी बोलविले या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. दोन्ही गटातर्फे लोखंडी सळई, लाठय़ा, काठय़ांचा वापर करण्यात आला. याबाबत सूरज जयसिंग वळवी यांच्या फिर्यादीनुसार डॉ.रवींद्र देवीदास पाटील, मोग्या भांग्या वळवी, चंपक इरजी सर्व रा.सोरापाडा व गंगधा गुजरात येथील इतर दोन ते तीन जण यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यात सूरज वळवी हे जखमी झाले. जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद रवींद्र देवीदास सोनवणे यांनी दिली. बँकेच्या लोकांना शेतात आणले याचा राग येऊन जयसिंग पोसल्या वळवी, सूरज जयसिंग वळवी, जलपत पोसल्या वळवी, भरत पोसल्या वळवी, कमलीबाई जयसिंग वळवी, कालुसिंग रोडत्या पाडवी, जेसा मगन पाडवी, सुदाम सुकलाल वळवी सर्व रा.सोरापाडा यांनी लोखंडी सळई तसेच हाताबुक्यांनी मारहाण केली.

रवींद्र सोनवणेची प}ी भांडण सोडविण्यास गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली. मारहाणीत रवींद्र सोनवणे जखमी झाले. जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद घाटे व फौजदार महाडिक करीत आहेत.