शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीर ग्रामपंचायत देणार शौचालय नसणा:या कुटुंबाना नोटीसा

By admin | Updated: June 27, 2017 16:44 IST

सोनगीर ग्रामपंचायतीचा निर्णय : 494 जणांकडे नाही शौचालये; आजपासून कार्यवाहीला सुरुवात

ऑनलाईन लोकमत 

सोनगीर,दि.27- धुळे तालुक्यातील सोनगीर गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयांसाठी ग्रामपंचायत दप्तरी नोंदणी असलेल्या 2,160 कुटुंबापैकी तब्बल 494 कुटुंबाकडे शौचालय नसल्याची माहिती ग्रा. पं. कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यानुसार संबंधितांना नोटीसा देण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. बुधवारपासून नोटीसा वाटपाची कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती ग्रामसेवक अविनाश बैसाणे यांनी दिली. 
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोनगीर ग्रामपंचायत कार्यालयाने ‘स्वच्छ सोनगीर मिशन’ राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाश्र्वभूमीवर हगणदारीमुक्त सोनगीर गाव संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 
सर्वेक्षणातून माहिती कळली 
काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचा:यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतस्तरावर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ग्रामपंचायतच्या  दप्तरी नोंदणी  असलेल्या 2,160 कुटुंबापैकी 494 कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे माहिती समोर आली होती. त्यानुसार 1 मे रोजी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार शौचालये नसलेल्या लाभार्थीना नोटीसा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता ग्रा. पं. कार्यालयातर्फे प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. 
लाभार्थीनी सहकार्य करण्याचे आव्हान!
शासनाच्या वैयक्तीक शौचालयाचा लाभ लाभार्थीना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच योगीता महाजन, उपसरपंच धनंजय कासार व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे. 2016-17 या वर्षात ज्या कुटुंबानी वैयक्तीक शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. त्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. 
उघडय़ावर शौचास बसणा:यांना कारवाईचा इशारा 
उघडय़ावर किंवा सार्वजनिक जागेवर शौचास बसणे आरोग्याच्या दृष्टीने धोकेदायक आहे. गावात असे कृत्य करणा:यांवर यापुढे मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 115 व 117 नुसार कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायत कार्यालयातर्फे देण्यात आला आहे.  
 
शौचालय बांधण्यासाठी 5 जुलैर्पयत मुदत
शौचालये बांधण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सोनगीर गावात वेळोवेळी जनजागृती करण्यात आली आहे. तसेच गावात लाभार्थीना त्याचे तोंडी महत्वही पटवून देण्यात आले आहे. 
ग्रामसभेतदेखील शासनाकडून मिळणा:या अनुदानाची माहिती लाभार्थीना देण्यात आली आहे. तरीही गावात अनेक शौचालयांचे कामे अपूर्ण आहेत. 
त्यामुळे आता बुधवारपासून संबंधितांना नोटीस देण्यात येणार असून पाच जुलैर्पयत लाभार्थीनी शौचालयाचे बांधकाम न केल्यास त्यानंतर लाभार्थीना स्वस्त धान्य दुकानदारांकडून मिळणारे धान्य व रॉकेल बंद करण्याची शिफारस ग्रामपंचायत कार्यालयातर्फे जिल्हा प्रशासनाकडे  केली जाणार आहे.