धुळे : संपूर्ण भारतात दिसणारे सुर्यग्रहण धुळ्यात तब्बल २ तास ५१ मिनीटे दिसले, अशी माहिती खगोलप्रेमी रत्नेश पंडीत यांनी दिली़ ढगाळ वातावरण असलेतरी विद्यार्थ्यांसह अनेकांनी त्याचा अनुभव घेतला़ शाळकरी विद्यार्थ्यांना विशिष्ठ प्रकारचा चष्मा देवून सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली़धुळ्यात सुर्यग्रहणाला ८ वाजून ६ मिनीटे आणि ४० सेकंदांनी सुरुवात झाली़ ग्रहण मध्य ९ वाजून २४ मिनीटे आणि ४१ सेकंदांनी झाला़ तर, ग्रहण अस्त सकाळी १० वाजून ५८ मिनीटे आणि २० सेकंदांनी झाला होता़ हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपाचे होते़ धुळ्यात हे ग्रहण तब्बल २ तास ५१ मिनीटे नागरिकांना पहावयास मिळाले़ या वर्षाचे हे शेवटचे सूर्यग्रहण होते़ अनेकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला़ काहींनी उघड्या डोळ्यांनीही पाहण्याचा आनंद लुटला़न्यू सिटी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एऩ एम़ जोशी यांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारचे चष्मे देवून सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली होती़
२ तास ५१ मिनीटे दिसले सूर्यग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:16 IST