शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

म्हसदीत धुव्वाधार : पत्रे उडाली, बांध फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:44 IST

पावसाचे आगमन : पिंपळनेरसह चिकसे, देगाव शिवारातही पावसाच्या सरी, शेती कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : पिंपळनेरसह म्हसदी शिवारात बुधवारी सायंकाळी उशीरा झालेल्या जोरदार पावसात काही घरांची पत्रे उडाली़ तर काही ठिकाणी शेताचे बांध फुटून माती वाहून गेली़ कोरड्या झालेल्या बंधाºयामध्ये काही अंशी पाणी अडकल्याने समाधान व्यक्त होत आहे़ या भागात शेती कामाला सुरुवात झाली आहे़ साक्री तालुक्यातील पिंपळनेर, सामोडे, चिकसे, देगांव, शेणपूर, मलांजन या ठिकाणी जोरदार पाऊस झाला असलातरी पिंपळनेर प्ऱ म्हसदी शिवारात पाण्याचा जोर जास्त होता़ येथील काही शेतकºयांच्या टमाटे पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे़ मिरची पिकांचेही चांगलेच नुकसान झाले आहे़ वालपापडीच्या फुलांची गळती झाल्याने उत्पन्न घटणार असल्याचे चित्र आहे़ कोथंबीरचेही नुकसान पावसामुळे झाले आहे़ तसेच चिकसे, देगाव, पिंपळनेर, प्र-म्हसदी शिवारात काही शेतकºयांच्या शेतात पाणी जास्त साचल्याने बंधारे फुटून वाहून गेले़ तर काही शेतकºयांच्या शेतातील मातीच वाहून गेली़ परिणामी शेतातच  ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत़ तर चिकसे येथील शोभाबाई भटू महाले यांच्या शेतातील घरांचे पत्रे उडून गेली़ तसेच एका घरांमध्ये असलेला गुरांचा चारा आणि नऊ क्विंटल गहू संपुर्ण ओला झाला आहे़ या जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे़ पिकांना वाचविण्यासाठी शेतकºयांना आता रासायनिक खतांची फवारणी करावी लागले असे चित्र दिसत आहे़ पण, जोरदार पावसामुळे परिसरात नाल्यांवर बांधण्यात आलेल्या बंधाºयांमध्ये पाणी साचले आहे़ दरम्यान, नुकसान झालेल्या शेती पिकांचा पंचनामाचे काम अद्याप कुठेही सुरु झालेले नाही़ 

धुळ्यातही पावसाची हजेरी, उडाली धावपळ४धुळे शहरात गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता़ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ढग भरुन आले आणि सोसाट्याचा वारा सुरु झाला़ त्यानंतर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली़ सुमारे पाऊण तास दमदार पाऊस झाला़४अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली़ शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकात भाजी विक्रेत्यांच्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे चांगलीच धावपळ उडाली़ तर रेल्वे स्टेशन भागात झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने पाणी बाहेर काढण्याची लगबग सुरु होती़ ४शहरातील बसस्थानकात देखील बºयापैकी पाणी साचले होते़ परिणामी बसमधील प्रवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागला़ साहजिकच अनेकांनी नाराजी दर्शविली़ 

टॅग्स :Dhuleधुळे