शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

लघु पशुचिकित्सालय बांधकाम प्रस्ताव धूळखात

By admin | Updated: January 12, 2016 00:41 IST

तळोदा : लघु पशुचिकित्सालयासाठी बांधकामाचा प्रस्ताव संबंधित आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

तळोदा : लघु पशुचिकित्सालयासाठी बांधकामाचा प्रस्ताव संबंधित आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तथापि, हा प्रस्ताव मंजुरीअभावी गेल्या तीन वर्षापासून तसाच धूळखात पडला आहे. तालुक्यातील एकमेव मोठा दवाखाना लक्षात घेऊन बांधकामाच्या या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याची आवश्यकता आहे.

तळोदा येथील विद्यानगरी परिसरातील लघु पशुचिकित्सालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पशुधनासही पुरेसा उपचार मिळण्यास अडचणी निर्माण होत असतात. या पाश्र्वभूमीवर या पशुचिकित्सालयाची सुसज्ज इमारत होण्यासाठी सातत्याने पशुपालकांकडून मागणी केली जात होती. त्या आनुषंगाने आरोग्य विभागाने तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकामाचा प्रस्ताव मागविला होता. त्यानुसार, बांधकाम विभागाने 2012 साली चार कोटी नऊ लाखांचा प्रस्ताव तातडीने पाठवला होता. परंतु हा प्रस्ताव मंजुरीअभावी तसाच गेल्या तीन वर्षापासून धूळखात पडला आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनपावेतो कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

4या दवाखान्यास पूर्वी साध्या गुरांच्या दवाखान्याचा दर्जा होता. परंतु तालुक्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन या दवाखान्यास लघु पशुचिकित्सालयाचा दर्जा देण्यात आला. साहजिकच येथे उपचारासाठी मोठय़ा संख्येने पशुपालक आपली जनावरेही आणत होते. मात्र दवाखान्याच्या अतिशय दुरवस्थेमुळे पशुपालक उपचारासाठी जनावरे आणत नाहीत. कारण या दवाखान्यात पुरेशा सुविधा नाहीत. वास्तविक तालुक्यातील एकमेव मोठे पशुचिकित्सालय आहे. त्या दृष्टीने येथे सर्व सुविधा असणे अपेक्षित आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने कायम दुर्लक्ष केले आहे. या दवाखान्याचे स्लॅबही तुटलेले आहेत. पावसाळ्यात पूर्णत: गळते. याशिवाय खिडक्याही तुटल्या आहेत. तसेच लसी ठेवण्यासाठीही पुरेशा सुविधा नाहीत. तसेच कर्मचा:यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. दवाखान्याच्या शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि या बाजार समितीसमोर दर शुक्रवारी पशुधनाचा बाजारही भरतो. त्यामुळे दवाखान्यात सर्व सुविधा ठेवण्याची आवश्यकता असताना आरोग्य विभाग गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे पशुपालकांनाही पुरेशा उपचारापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप आहे.

4तालुक्यातील या लघु पशुचिकित्सालयात कर्मचा:यांच्या चार जागा असताना केवळ एकमेव सहायक उपायुक्त दर्जाचा पशुधन विकास अधिकारी काम करीत आहे. त्यामुळे या दवाखान्याचा भार एकाच कर्मचा:यावर सुरू आहे. कर्मचा:यांच्या चार जागा रिक्त असताना भरतीबाबत सातत्याने मागणी होऊनही ठोस कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे पशुधनासही पुरेसा उपचार मिळत नाही. वास्तविक तालुक्यात एकमेव मोठा दवाखाना असताना कर्मचा:यांच्या भरतीबाबत संबंधित विभाग उदासीन धोरण घेत आहे. पशुचिकित्सालयाच्या अवस्थेप्रमाणेच तालुक्यातील दवाखान्यांमध्येही असेच चित्र आहे. कारण वर्ग एकचे तालुक्यात चार दवाखाने आहेत. मात्र दोनच पशुधन विकास अधिका:यांवर भार सुरू आहे. कर्मचा:यांची अशी वस्तुस्थिती असताना आरोग्य विभाग ठोस कार्यवाही करण्यास तयार नाही. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये पशुधन विकास अधिका:यांची संख्या समाधानकारक आहे. मात्र तळोद्यासारख्या आदिवासी तालुक्यात या कर्मचा:यांची वानवा आहे. संबंधितांच्या दुजाभावाच्या धोरणाबाबत येथील लोकप्रतिनिधींनीही कानावर हात ठेवल्याने पशुपालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन निदान कर्मचा:यांच्या नियुक्तीबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी आहे.

साहेब आणि शिपाईही एकच

4एवढेच नव्हे तर या पशुचिकित्सालयात शिपायाचे पदही गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे शिपायाचे कामही या सहायक उपायुक्त दर्जाच्या अधिका:यालाच करावे लागत असल्याचे चित्र आहे.