शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील तरुणाच्या खुन प्रकरणी दोघांना शिताफिने अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 13:07 IST

कालिकामाता मंदिराजवळील घटना : पैसे लुट करताना प्रतिकार केल्याच्या रागातून घडला प्रकार

धुळे : मोबाईल आणि पैशांची लूट करत असताना त्याला प्रतिकार केल्याने रागाच्या भरात साथीदाराच्या मदतीने डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून केल्याची कबुली दोघांनी दिली आहे़ अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली़धुळे शहरातील शिवाजी रोडवरील कालिका माता मंदिराजवळ जितेंद्र शिवाजी मोरे या ३५ वर्षीय तरुणाचा शनिवारी पहाटेच्या सुमारास कोणीतरी दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात तरुणाच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़ या घटनेचा तपास शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचा संयुक्त तपास सुरु होता़ अशाताच शनिवारी पहाटे मारहाण करुन पैसे हिसकावून दोन अनोळखी इसमांबद्दल स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार तपासाला सुरुवात करण्यात आली़ याप्रकरणी राहुल उर्फ हंक्या सुनील घोडे (१९, रा़ दैठणकर नगर, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे) याला ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी केली असता त्याने खुनाचा गुन्हा हा मयत तरुणाचा मोबाईल व पैसे लुट करत असताना प्रतिकार केल्याने रागाच्या भरात साथीदार हर्षल जिजाबराव पाटील याच्या मदतीने डोक्यात दगड टाकून खून केल्याची कबूल केले आहे़ दोघांना अटक करण्यात आली आहे़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस कर्मचारी रफिक पठाण, श्रीकांत पाटील, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मयूर पाटील, तुषार पारधी, गुलाब पाटील यांनी ही कारवाई केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे