धुळे : विधानसभा निवडणुकीत धुळे शहरातून उमेदवारी न मिळाल्याने, पक्षापासून लांब गेलेले माजी आमदार प्रा. शरद पाटील हे शिवसेनेत पुन्हा सक्रीय होणार आहेत. सेनेत सक्रीय होण्याबाबत प्रा.पाटील यांनी दुजोरा दिलेला आहे.२००३ पासून प्रा. पाटील हे शिवसेनेत पूर्णवेळ सक्रीय होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रा.शरद पाटील हे धुळे ग्रामीण मतदार संघातून विजयी झाले होते. मात्र २०१४ मध्ये भाजप-सेना युती तुटल्याने, धुळे ग्रामीण मतदार संघातून त्यांचा पराभव झाला होता.दरम्यान २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र पक्षाने ऐनवळी त्यांना धुळे शहर मतदार संघातून उमेदवारी नाकारून जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी न मिळाल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून पक्षापासून लांब गेले होते. पक्षाच्या काही पदांचा त्यांनी राजीनामाही दिला होता.दरम्यान राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर त्यांनी प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेतली. तसेच धुळे येथे कृषी विद्यापीठ स्थापन करावे, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर स्थापन करून चालना द्यावी याविषयी चर्चा केली. यावर मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. धुळे दौºयावर आल्यानंतर मुख्यमंत्री या कामांची आढावा घेणार आहेत.पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू. सन्मानजनक जबाबदारी मिळाल्यानंतरच शिवसेनेत पुन्हा सक्रीय होईल. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. ^- प्रा.शरद पाटीलमाजी आमदार, धुळे ग्रामीण
शरद पाटील शिवसेनेत पुन्हा सक्रीय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:23 IST