शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांवर ‘जप्ती’ची कारवाई!

By admin | Updated: April 1, 2017 00:35 IST

महापालिका : मालमत्तेसह टॉवरवर धडक, 25 पथकांकडून 28 कोटींवर वसुली

धुळे : महापालिकेच्या वसुली विभागाने धडक मोहीम राबवून नियमित आणि थकबाकीदार यांच्यावर कारवाई करत 28 कोटी 50 लाखांचा आकडा पार केला आहे, अशी माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़ एकूण मागणी ही 30 कोटी 46 लाखांची आह़े दरम्यान, पुढील आठवडय़ापासून थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितल़े गेल्या काही महिन्यांपासून शहराचा वाढणारा विस्तार लक्षात घेता मालमत्ता थकबाकीदारांची संख्यासुद्धा वाढत आह़े सध्या शहरात सुमारे 80 हजारांवर मालमत्ताधारक असल्याचे सांगितले जात़े परंतु वस्तुत: ही आकडेवारी खूपच मोठी आह़े त्यातील बहुतांश मालमत्ताधारकांनी आपल्याकडील करांचा भरणा महापालिकेत जमा केलेला नाही़ तर ब:याच जणांनी मालमत्तेची नोंदसुद्धा केलेली नाही़ ही बाब तपासणीतून समोर आलेली आह़े थकबाकीची रक्कम त्यांनी महापालिकेकडे का जमा केली नाही, वसुली करण्यासाठी कोणी गेलेच नाही का, अशा विविध बाबींच्या माहितीचे संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले आह़े त्यात साधारणपणे 10 हजारांपासून पुढे असलेल्या थकबाकीदारांची माहिती संकलित करण्यात आली असून काही जणांनी लाखाचाही टप्पा ओलांडलेला आह़े जप्ती टाळण्याचे आवाहनमहापालिका केवळ ‘कराचा भरणा करा, जप्ती टाळा’ असे आवाहन करत आह़े पण अपेक्षित प्रमाणात त्याचा उपयोग होत नसल्याचे समोर आल्यानंतर कारवाईचे सत्र उपासण्याचे धोरण आखण्यात आले. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली़ 11 मार्च 2017 पासून कारवाईचे सत्र अवलंबण्यास सुरुवात करण्यात आली़ थकबाकी वसूल करायची असल्याने त्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली़ सुरुवातीला केवळ पाच अधिका:यांचे पथक होत़े कालांतराने त्यात वाढ होऊन शेवटी तर 25 अधिका:यांच्या पथकाची नियुक्ती आयुक्तांनी केली़ त्यामुळे जवळपास सर्वच अधिकारी आणि ठरावीक कर्मचारी वसुलीसाठी शहरात फिरत होत़े विशेष म्हणजे 10 हजारावर रक्कम असल्यास लिपिकवर्गीय कर्मचारी कारवाई करतील आणि 25 हजारावर रक्कम थकली असल्यास त्या भागाचे निरीक्षक कारवाई करतील, असे ठरविण्यात आल्याने त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली़  दरम्यान, थकबाकीदारांच्या मालमत्तेवर लवकरच जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आह़े महापालिकेच्या वसुली विभागाने दरवर्षाप्रमाणे यंदाही उद्दिष्ट निश्चित केलेले होत़े ही रक्कम सर्वाधिक वसूल होण्यासाठी वसुली पथकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी याशिवाय महापालिकेतच स्वतंत्रपणे पाच काउंटर सुरू करण्यात आले होत़े त्यातील एका काउंटरवर तर एटीएम कार्ड स्व्ॉप करून दिले जात होत़े अनेकांनी त्याकडे धाव घेतली होती़ तर मनपा आवारात 4 ठिकाणी पैसे स्वीकारण्यासाठी काउंटर लावण्यात आले होत़े उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंडप उभारण्यात आला होता़ तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जारदेखील उपलब्ध करून देण्यात आले होत़े महानगरातील नागरिकांनी आपल्याकडील कराचा भरणा नियमित महापालिकेकडे जमा करणे अनिवार्य आह़े पण, काही जण हा भरणा भरत नसल्यामुळे नाइलाजाने कारवाई करणे भाग पडत़े वेळोवेळी आवाहन करूनही थकबाकीदारांनी आपल्याकडील थकीत कराचा भरणा भरलेला नसल्यास अशांवर लवकरच जप्तीची कारवाई करण्यात येईल़ -संगीता धायगुडे, आयुक्त