शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी विशेष मोहिम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 22:00 IST

कृषी मंत्री : मका पिकाची पहाणी, महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन

धुळे : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी धुळे जिल्ह्याच्या दौºयादरम्यान साक्री तालुक्यात विटाई येथे मका पिकाची पाहाणी केली तर लोणखेडी येथे आयोजित महिला शेती शाळेस मार्गदर्शन केले़मंत्री दादा भुसे यांनी विटाई, ता. साक्री येथे धनराज गजमल खैरनार यांच्या शेताला भेट देवून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मका पीक प्रात्यक्षिकाची पाहणी केली. त्यानंतर डाळिंब बागेची पाहणी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यावेळी आमदार मंजुळा गावित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, साक्रीचे तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, पंचायत समितीचे सदस्य राजधर देसले, विटाईचे सरपंच भीमराव खैरनार, कासारेचे सरपंच विशाल देसले आदी उपस्थित होते. त्यानंतर बेहेड ता. साक्री शिवारात गवार आणि तूर पिकांचे आंतरपीक घेतलेल्या शेतकºयाच्या शेतात जावून त्यांच्याशी संवाद साधला. गवारची बाजारपेठ, उत्पन्न, लागवड याविषयी त्यांनी संवाद साधला. याशिवाय मंत्री भुसे यांनी नांदवण, ता. साक्री येथील दाळ मिलला भेट देवून पाहणी केली.कृषी मंत्री दादा भुसे यांनी लोणखेडी ता. धुळे येथे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सुरू असलेल्या शेतीशाळेस भेट देवून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, शेती शाळेत मिळालेले ज्ञान आपल्या परिसरातील अन्य महिला शेतकºयांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होईल. महिला शेतकºयांना मंत्री भुसे, आमदार गावित, सामाजिक कार्यकर्ते हिलाल माळी यांच्या हस्ते शेतकरी कीटचे वितरण करण्यात आले. सीमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळ कृषी अधिकारी अमृत पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यानंतर मंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठक घेतली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत धुळे जिल्ह्यातील ४० हजार ९६४ शेतकºयांना ३०७ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. त्या तुलनेत पीक कर्जाचे वितरण कमी आहे. त्यामुळे अग्रणी बँक, जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकºयांना पीक कर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवावी़ पीक कर्ज वितरणाचा दर तीन दिवसांनी आढावा घ्यावा, असे आदेश दादा भुसे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले़यावेळी आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, जिल्हाधिकारी संजय यादव, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे