शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरला कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर ठेवले सडलेले पीके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 14:50 IST

प्रहार जनशक्ती पार्टीचा राडा, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) :तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास उशीर होत असल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका कृषी कार्यालयात राडा करण्यात आला. तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावरच सडके पीके ठेवली. कार्यालयाच्या आवारात सडलेल्या पिकांची रोपे फेकण्यात आल्याची घटना आज घडली.शिरपूर तालुक्यात गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व भागातील नदी,नाले,जलाशये व सिंचन प्रकल्प काही प्रमाणात भरून नद्यांनी प्रवाहाचा वेग धरला आहे .कमी जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. पिके पिवळी पडली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान झाले आहे. जास्त पावसामुळे मुख्य पीक असलेले मुग,उडीद, कापूस ही पीके हातची गेली आहेत. आधीच शेतकरी करोनाचा आस्मानी संकटामुळे प्रचंड अडचणीत आला असून, त्याला आता अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. खरिपांच्या पिकांवर आशा होती. पाऊसही सुरवातीला चांगला झाला. नंतर अतिवृष्टीने पीके सडू लागली.सरकार घोषणा करते,परंतु अजूनही बँकांच्या धोरणामुळे शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध होत नाही.नुकताच्या झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून,खरीप पिके पिवळी पडत आहे. मूग पिकाच्या शेंगा झाडावरचं सडायाला लागल्या आहेत. शेतीतील नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे त्वरित करून शेतकºयांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.जेणेकरून खरिपाचे झालेले प्रचंड नुकसान शेतकरी रव्बी पीकांमधून जसे जमेल तेवढे भरून काढण्याचा प्रयत्न करतील. पण त्यासाठी रव्बी पेरणी आधीच त्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी प्रहार जनशक्तीची मागणी आहे.नुकसानीचे पंचनामे तात्काळ न झाल्यास कृषी कार्यालयातील कृषी अधिकाºयांसह सर्व मंडळ अधिकाºयांना काळे फासू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष शिरपूर यांच्या वतीने देण्यात आला.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, विजय कोळी, स्वप्निल राजपूत, नितीन जाधव, निलेश कोळी, मनोज राजपूत, मुकेश पाटील, महेंद्र पाटील, योगेश माळी, प्रमोद बडगुजर, किशोर बोरसे, नाना माळी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे