शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शेळ्या-मेंढ्यांसाठी रान मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 13:27 IST

कापडणे : पाणीटंचाईमुळे पांढऱ्या कांद्याची रोपे कवडीमोल, दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल

कापडणे : शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत घेऊन शेतात पांढºया कांद्याची रोपे तयार केली. मात्र, पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांना ही कांदा रोपे विक्रीस काढावी लागली. परंतू सातत्याने कांद्याला तुटपुंजा भाव मिळत असल्याने उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्यामुळे या रोपांना ग्राहकच उपलब्ध झाले नाही. अखेर आर्थिक फटका सहन करीत शेतकºयांनी कांदा रोपाच्या शेतात शेळ्या-मेंढ्यांना चारण्यास मुभा दिल्याचे भयावह वास्तव धमाणे शिवारात दिसून आले.धुळे तालुक्यातील धमाणे, न्याहळोद, बिलाडीरोड, देवभाने, कौठळ, धनुर, तामसवाडी आदी शिवारातील शेतकºयांनी उन्हाळी हंगामात पांढरा कांदा पिकाची लागवड करण्यासाठी आप-आपल्या शेतात पाणीटंचाईचे नियोजन करूनही कांदा रोपाची लागवड केली.मात्र, सर्वत्र शेत शिवारातील विहिरी, कुपनलिकांची पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. अनेक ठिकाणी विहिरी आटल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ज्या विहिरी दीड ते दोन तास चालायच्या. त्याच विहिरी व कूपनलिका आता केवळ वीस ते तीस मिनिट चालतात तर काही विहिरीमधून शेतात गुरांना पाणी पाजण्यासाठी बांधण्यात आलेले पाण्याचे हौदच जेमतेम भरतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा पिक घेणे शक्य नसल्याने अनेक शेतकºयांनी मोठ्या आशेने तयार केलेली पांढºया कांद्याची रोपे विक्रीसाठी काढली. मात्र, कांदा रोपे घेण्यासाठी कुणीही शेतकरी इच्छूक नसल्याने दीड महिने जीवापाड जपलेल्या कांदा रोपांचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला. आणि अखेर शेतकºयांनी कांदा रोपाच्या शेतात शेळ्या मेंढ्यांना चारण्यास गुराख्यांना मुभा दिली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे