शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दंगेखोरांची गय नाही, प्रशासन मुळार्पयत पोहोचणार

By admin | Updated: January 26, 2016 00:38 IST

नंदुरबार : गाव, शहर अशांत करून आणि बंद पुकारून लोकांना वेठीस धरू नका.

नंदुरबार : गाव, शहर अशांत करून आणि बंद पुकारून लोकांना वेठीस धरू नका. मूठभर लोक जिल्ह्यातील शांतता बिघडविण्याचे काम करीत असल्याने त्यांच्या मुळार्पयत पोहचून पडद्यामागचे चेहरे प्रशासन उघड करेल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सोमवारी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत सांगितले.

गेल्या दोन आठवडय़ातील घटनांच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत सदस्यांनी पोलिस व जनतेत संवाद नसल्याचा आरोप डॉ.मतीन शेख यांनी केला. देवेंद्र जैन यांनी व्यापा:यांना जबरदस्तीने बंद करण्यास काही लोक भाग पाडतात, असा आरोप केला.

तोच धागा पुढे पकडत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पोलिसांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी, असे सांगत पोलिसांच्या नरमाईच्या भूमिकेवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही, म्हणूनच विघातक शक्तींना बळ मिळत आहे. अगदी पोलीस ठाण्यात येऊन लोक पोलीस अधिका:यांची कॉलर धरतात. अशा घटना दुर्दैवी आहेत. पोलिसांनी कठोर व्हावे, अशी सूचना करीत त्यांनी शहरातील फलकांबाबत पालिकेची भूमिका मांडली. यापुढे जर सर्वाची इच्छा असेल तर कुणालाही फलक लावण्यास परवानगी देणार नाही.

आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी परवानगीच देवू नये असे ठामपणे सांगत फलक लावणा:यांवर यापुढे प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. पोलिसांवर त्यांनीही आरोप करीत आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलाच पाहिजे; पण त्याचे रक्षकच कर्तव्य विसरत असल्याचे त्यांनी सांगितले.

शांतता समितीतील प्रत्येक सदस्याने जर आपापल्या गल्लीतही शांतता ठेवण्यासाठी प्रय} केल्यास दंगे होणारच नाही. यापुढे पालिका व प्रशासनानेही प्रत्येक दुकानाला आणि कॉलनींना परवानगी देताना सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावे, शिवाय प्रशासनानेही पुढाकार घेऊन या योजनेला गती द्यावी, असे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये यांनी पोलीस आपले काम चोख बजावत आहे. यापुढे काही चुका असल्यास त्या दूर करून अधिक जोमाने काम करू, पण त्यासाठी जनतेचेही सहकार्य असावे. प्रत्येक दंगलीत जखमी होणारा पोलीसच असतो. लोकांचे रक्षण करण्यासाठी तो स्वत: आपल्या अंगावर दगडांचा मार ङोलतो. दगड मारणारा एकच असतो; पण 99 जण ते पाहात असतात. त्यामुळे 99 जणांनी त्या एकाचा हात रोखल्यास दंगलच होणार नाही, असे सांगितले.या वेळी समितीतील अनेक सदस्यांनी आपली मते मांडली.