शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक शौचालयांची जबाबदारी सरपंचांवर

By admin | Updated: February 28, 2017 00:45 IST

जिल्हा परिषद : सर्वाधिक साक्री तालुक्यात, तर शिरपुरात कमी कामांचा समावेश

धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही स्वच्छतेबाबत जनजागृती करावी लागत असल्याचे दु:ख आहे़ ग्रामसेवकांप्रमाणे आता त्या त्या गावातील सरपंचांवरही वैयक्तिक शौचालयाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छता व  वैयक्तिक शौचालयांचे काम समाधानकारक न झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांची लवकरच सुनावणी घेण्यात येईल, असे आदेश  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले होते़ त्यामुळे आता लवकरच सरपंचांची सुनावणी घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत़   दहितेंचा पुढाकारगेल्या महिन्यात जिल्ह्यातील चारही तालुकानिहाय ग्रामसेवकांची सुनावणी घेण्यात आली़ वैयक्तिक शौचालयांसंदर्भात अतिशय कमी काम झालेल्या ग्रामसेवकांची खरडपट्टी निघाल्यानंतर आता सरपंचांकडे नजर वळविण्यात येणार आहे़ अध्यक्ष दहिते यांनी याकामी पुढाकार घेऊन लवकरच त्याबाबत बैठक घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत़ शौचालयासाठी पाण्याची गरजबहुसंख्य ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्यामुळे पाणीटंचाईबाबत अधिकारिवर्ग किती दक्ष आहे, याबाबतही चाचपणी घेण्यात येणार आहे़ शौचालयासाठी पाणी गरजेचे असल्याने त्या दृष्टीने लक्ष दिले जात आहे़ कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत, याचा धावता आढावा होणार आहे़ ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असेल त्या ठिकाणी लक्ष देण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आलेल्या आहेत़  निधीबाबत पाठपुरावाजिल्हा परिषदेला मिळणारा निधी हा जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त होत असतो़ त्या आनुषंगाने आजवर मिळालेला आणि प्राप्त होणाºया निधीबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़ तसेच विविध योजनांचा आढावा घेत असताना तातडीने आपल्याकडील निधी खर्च करण्याच्या सूचनाही या वेळी विभागप्रमुखांना देण्यात आल्या़ त्यात वैयक्तिक शौचालयांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे़ ग्रामस्थांना याकामी देण्यात येणाºया १२ हजारांच्या निधीचाही हिशेब लवकरच घेण्यात येणार        आहे़ या सर्व कारवाईला येत्या आठवड्यात सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनातर्फे   देण्यात आली.लवकरच होणार सुनावणीजिल्ह्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालये किती प्रमाणात मार्गी लावले जात आहेत, त्यांचा वापर नियमित होतो का? याची चाचपणी सध्या सुरू झालेली आहे़कमी काम झालेल्या ग्रामसेवकांनंतर आता सरपंचांकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे़ त्यांचीही जबाबदारी गावात मोठी असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांकडून यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे़