१ मे पासून शासनाच्या धोरणानुसार १८ वर्षांवरील सर्व लाभार्थींसाठी मोहीम खुली करण्यात आली आहे.
लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी आवश्यक असलेला लस साठा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . संतोष नवले, डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे लसीकरण मोहीम राबविणे सोयीचे झाले आहे. ही मोहीम राबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रीती गावित, डॉ. सौरभ मावची, औषध निर्माण अधिकारी राजेश कुवर, प्रयोगशाळा अधिकारी सी. पी. अहिरे, आरोग्य सहायक आर. पी. क्षत्रिय, गोरख पाटील, बेडसे, भारती बिरारी, स्नेहल राऊत, शिंपी, सुलोचना पवार, कविता गांगुर्डे, जाधव, परदेशी समुदाय आरोग्य अधिकारी पाटील, पाटोळे, हाटकर, बागुल गाढे, नाठे, दीपक सोनवणे, सी. जे. सोनवणे, अनिकेत साळुके, आदींचे सहकार्य लाभले.