सध्या बेड उपलब्ध न झाल्याने खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांना दाखल करावे लागत आहे़ त्याठिकाणी रूग्णांसाठी इंजेक्शन उपलब्ध होत नाही़ रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असतांना कोरोना बाधित रूग्णांच्या नातेवाईकांची भटकंती सुरू आहे़ परंतु इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईक हवालदिल झाले होते़ हे इंजेक्शन विकतांना अवाजवी पैसे घेवू नये, इंजेक्शनच्या मुळ किंमती इतकीच रक्कम ग्राहकांकडून घ्यावी असे नियम असले तरी अतिरिक्त किंमत देवून हे इंजेक्शन घ्यावे लागत होते़.मात्र मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या योगदानातून अल्प दरात ७७५ रुपयात रेमडेसिव्हरचे इंजेक्शन आर.सी.पटेल जेनरीक औषधी केंद्रात उपलब्ध करून देण्यात आले़ विशेषत: अहमदाबाद येथील झायडस कॅडीला कंपनीचे मालक .डॉ़पंकजभाई पटेल, माजी खासदार स्व.मुकेशभाई पटेल यांचे जावई तथा कॅडिला हेल्थकेअर लि. (अहमदाबाद) मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.शर्विलभाई पटेल, मेहाबेन शर्विलभाई पटेल व मुंबईच्या द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या विशेष सहकार्याने या तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांना हे इंजेक्शन अल्प दरात उपलब्ध करून दिले आहे़ नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हॅक्सीन लसची माहिती घेण्यासाठी झायडस कॅडिला या कंपनीला भेट देऊन माहिती जाणून घेतली होती़
सदरचे इंजेक्शन घेणेसाठी पटेल जेनरीक औषधी केंद्रावर सोबत दिलेला अर्ज डॉक्टरांच्या सही शिक्यासहित जमा केल्यावरच त्यांना इंजेक्शन मिळणार आहे. सदरचे अर्ज सर्व कोविड सेंटरवर उपलब्ध करण्यात आले आहेत़.पटेल बंधूनी शिरपूरसह नंदुरबार, शहादा, दोंडाईचा, व धुळे येथे देखील रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा केला आह. त्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांना लाभ झालेला आहे.