शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडल्याने पांझरा नदी झाली प्रवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:50 IST

आतापर्यंत १२५ टीएमसी पाणी सोडले, ४० गावांना होणार फायदा

ठळक मुद्देधरणातून ३२५ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेशआतापर्यंत १२५ टीएमसी पाणी सोडले४० गावांना होणार फायदा

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांमध्ये पाणीच शिल्लक नाही. भीमा, कृष्णा, गोदावरी, तापी यासारख्या मोठ्या नद्यांच्या पात्रांमध्येही उन्हाळ्यात काही ठिकाणी ठणठणाट आहे. धुळे जिल्हयातून वाहणाऱ्या पांझरा नदीचे पात्रही पावसाळ्यातही कोरडठाक होते. मात्र नुकतेच अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे पांझरा नदी ऐन दुष्काळातही वाहत असल्याचे दिलासादायक चित्र बघावयास मिळत आहे. ऐन टंचाईच्या काळात नदी खळखळून वाहन आहे.गेल्यावर्षी झालेल्या अल्पशा पावसामुळे ऐन पावसाळ्यातही पांझरा नदीला पूर आला नव्हता. याचवर्षी अक्कलपाडा धरणातून सोडलेल्या आवर्तनाचा कालावधी वगळता नदीपात्र गेल्या दीडवर्षांपासून कोरडेठाक पडलेले आहे. नदीत स्वच्छ पाण्याऐवजी गटारीचेच पाणी जास्त आहे. त्यामुळे पांझरा नदी की गटारगंगा असाही काहींना प्रश्न पडत असतो.पांझरा नदीकिनारी धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी आहेत. पांझरा नदी किनारी असलेल्या गावांना गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार पाटबंधारे विभागाने गेल्या शुक्रवारी (दि.१० मे) अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात ३२५ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत १२५ टीएमसी पाणी सोडले असून, अजून २०० टीएमसी पाणी सोडणे बाकी आहे. सद्यस्थितीत धरणातून प्रत्येक सेकंदाला ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.धरणातून सोडलेले पाणी तीन दिवसानंतर म्हणजे सोमवारी शहरात पोहचले.शहरातही पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पाण्यासाठी काही भागात नागरिकांची भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत कोरड्या असलेल्या पांझरा नदीपात्रात पाणी आले आहे. भर उन्हाळ्यातही नदीपात्र प्रवाही झाल्याचे बघून अनेकांना दिलासा मिळालेला आहे. बारामाही वाहणाºया राज्यातील काही नद्यांचे पात्र कोरडे पडलेले असतांना पांझरा नदीत पाणी वाहत असल्याचे आल्हादायक चित्र शहरात बघावयास मिळत आहे. नदी वाहते आहे म्हणून काहीजण सायंकाळी नदीलगत फिरायला येऊ लागले आहेत. नदीचा खळखळाट अनेकांना आकर्षिक करू लागला आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे