शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शहराने परत दिली भाजपला साथ,काँग्रेस आणि राष्टÑवादी आघाडीला परत धुळेकरांनी नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:00 IST

डॉ.सुभाष भामरे यांना मतदारसंघातून २८ हजार ६५२ मतांचा लिड दिला.

राजेंद्र शर्मा।धुळे : मतदारसंघातील माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाशी बंडखोरी करुन लोकसंग्रामतर्फे उमेदवारी केली होती. त्यांच्या उमेदवारीचा भाजपा उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांना फटका बसेल असे वाटत होते. सुरुवातीला अनिल गोटे यांनीही आपली उमेदवारी ही भाजप उमेदवाराला पराभूत करण्यासाठी असल्याची घोषणा केली होती. नंतर त्यांनी उमेदवारी ही जिंकण्यासाठी असल्याचे सांगितले. त्यामुळे गोटे यांच्या उमेदवारीचा फटका भाजपला किती बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.दुसरीकडे दुसरीकडे काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीचे सर्वच नेते एकजुटीने प्रचार करीत असल्याने यंदा धुळे शहरातून काँग्रेसला चांगली मते मिळतील अशी अपेक्षा होती. तसेच मुस्लिम मतेही मिळतील असे चित्र होते. निवडणुकीत मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले होते. त्यामुळे मुस्लिम मतांच्या जोरावर काँग्रेस येथून जास्त मते मिळवू शकते, अशीही शक्यता वर्तविण्यात येत होती.परंतु या शक्यता आणि चर्चा पोल ठरल्याचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट झाले. कारण मतदारसंघातून डॉ.भामरे यांना सर्वाधिक मते मिळाली. दुसरीकडे माजी आमदार अनिल गोटे यांना मात्र ३ हजार ७२० एवढीच मते मिळाली. निवडणुकीत गोटे यांची अनामत रक्कमही जमा झाली आहे. एकूणच अनिल गोटे यांच्या उमेदवारीचा कुठलाही प्रभाव निवडणुकीत दिसून आला नाही.दुसरीकडे काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनाही फक्त ५७ हजार ३२२ मते मिळाली.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराने काँग्रेसची मते घेतली. त्यांच्या उमेदवारीचा फटका निश्चितच कॉंग्रेसला बसला.एकूणच महापालिकेनंतर या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस - राष्टÑवादी आघाडी स्पेशल फेल ठरली. दोन्ही पक्षाचे नेते एकत्र प्रचार करीत असले तरी त्याचा फायदा काँग्रेस उमेदवाराला मिळालाच नाही. म्हणजेच काँग्रेस - राष्टÑवादीचे मनोमिलन हे महापालिका निवडणुकीप्रमाणे यंदाही केवळ कागदावर आणि प्रचारापुरता एकत्र दिसत होते का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.धुळे शहर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीने भाजपाला फटका बसण्याची शक्यता ठरली पोल, भाजपाने येथूनही २८ हजाराचे मताधिक्य घेतले, निवडणुकीत गोटे यांची अनामतही झाली जप्त

टॅग्स :Dhuleधुळे