केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शनिवारी मुंबई- आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले.
शेतकरी कायद्याविरोधात देशभरातून पाठिंबा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही राजकीय पक्षांसह अनेकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. केंद्र सरकारने तिन्ही वादग्रस्त व अन्यायकारक असलेले कृषी कायदे मागे घ्या, हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यास बंदी घालावी. किमान हमी भावाचा कायदा करा, ३ टक्के ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरू करावा, सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा, तसेच कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी शहराचे आमदार फारुक शाह यांनी शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी पाठिंबा देण्याची भूमिका घेत ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता चाळीसगाव चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करून पाठिंबा दिला.
या आंदोलनाप्रसंगी मनपाचे नगसेवक सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, सलीम शाह, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, युवा जिल्हाध्यक्ष, वसीम अक्रम, शहराध्यक्ष सेहबाज शाह, मुजम्मील शाह, परवेज शाह, नीलेश काटे, निसार अन्सारी पठाण, इबा ठेकेदार, समद पठाण, हालीम समसुद्दीन अन्सारी, कैसर पेंटर, आसीफ शाह, रेहमान शेख, फिरोज पेहेलवान, युसूफ पिंजारी, हमीद शाह, आशिष सोनार, एजाज सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.